सरकार जे चालवतात त्यांच रक्त भगव आहे. असे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा सडेतोड समाचार आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस चौधरी चाँदपाशा गफूरसाब यांनी घेतला. आमच रक्त भगव नसुन आमच्या रक्तात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आहे आमच्या रक्तात, शिव,शाहू, फुले, आंबेडकर आहेत, आमच्या रक्तात विकासाचा ध्यास आहे, आमच्या रक्तात प्रज्ञा, शिल, करूणा आहे. आमच्या रक्तात समता, बंधुत्व, न्याय आहे. आमच्या रक्तात सर्वधर्म समभाव आहे, आमच्या रक्तात सामाजिक ऐक्य, सामाजिक बांधीलकी, सामाजिक न्याय आहे, आमच्या रक्तात सहनशिलता आहे, आमच्या रक्तात नितिमत्ता आहे, आमच्या रक्तात दया, क्षमा, शांती आहे, आमच्या रक्तात दुरदृष्टी आहे, आमच्या रक्तात मानसन्मान आहे, आमच्या रक्तात कर्तृत्व धाडस, दानत आहे. आमच्या रक्तात पराक्रम जिद्द, चिकाटी, शौर्य आहे. हे तुमच्या पण रक्तात असु दया. असा जाहीर टोला चौधरी यांनी राणे यांना लगावला. वारंवार मुस्लीम विरोधी वक्तव्य करीत असल्याने परिणामी राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र असे होऊ नये ही सर्वच भारतीयांचा मनिषा आहे. राज्यात शांतता राहावी, हिंदु मुस्लीम भाईचार कायम राहावा. म्हणून मुस्लीम विरोधी वक्तव्य करू नये, अशी विनंती पत्रकारांमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरीता या पत्रकार परिषदेचे आयोजन केले असल्याचे चौधरी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आज प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
आपण कायदयाद्वारे स्थापित झालेल्या घटनेनुसार शपथ घेतली आहे. संविधान व कायदया अनुसार सर्व त-हेच्या लोकांची निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणाच्या विषयी ममत्त्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणुक देईन अशी शपथ आपण घेऊन मुस्लीम समाजाबद्दल आकस बाळगत आहात हे न्यायोचित नाही. कधी आपण मस्जीद मध्ये शिरून मारु म्हणता तर कधी उरुस विरोधात बोलता, तर कधी परिक्षेत बुरखा बंदी घाला म्हणून बोलता, तर कधी इस्तेमावर बंदी आणण्यासाठी बोलता, तर कधी मदशावर बोलतात. आपण इस्तेमावर बंदीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि परीक्षेत बुरखा बंदीवर दादा भुसेना पत्र लिहिले, त्यांनी आपल्या पत्राला केराची टोपली दाखवली असे मी म्हणणार नाही पण त्यांनी तुमच्या पत्राकडे लक्ष दिले नाही असे मी म्हणेन, मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांचा मी आभारी आहे. त्यांनी जातीय सलोखा राखला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवू दिला नाही.आपण केरळला मिनी पाकिस्तान म्हणून संबोधले, राहुल गांधी व प्रियंका गांधीना अतिरेकी मतदान करतात म्हणता, आपण सुध्दा काँग्रेसमध्ये होता तेव्हा आपणालाही अतिरेकीच मतदान करत होते का? आपण कॉग्रेसमध्ये असतांना मुसलमानाच्या दाढया कुरवाळल्या आहेत, टोपी घातली आहे, दर्यात गेला आहात, तेव्हा काय सुन्ता करुन घेतली होती काय, सुन्ता करुन धर्मनिरपेक्षेचा गांधीवादाचा कलमा वाचला होता का? आता पुन्हा सुन्ता करुन जातीवादी हिंदुवादीचा कलमा वाचला काय? काँग्रेसमध्ये असलो की गांधीवादी धर्मनिरपेक्ष आणि भाजपामध्ये गेलो की जातीयवादी हिंदुत्ववादी हे कसे काय? तुम्ही हिंदुत्ववादी आहात की, मुस्लीम विरोधी?
तुमच हिंदुकडे दुर्लक्षच दिसतंय आज हिंदु शेतकरी आत्महत्या करतात, हिंदु तरुणांना रोजगार नाही हिंदु कर्जबाजारी झाला आहे. कालपरवा तर तुम्ही आत्महत्या रोखु शकलो नाही. हे तुमच दुदैव आहे. तुम्ही कधी पाहिलात का? कोण्या मौलवींनी मुसलमानांनी आत्महत्या केलेली, कधीच नाही तुमच्या आर्शीवादाने मुल्ला मौलवी मुसलमान सुखी समाधानी आहेत, तुम्ही सतत मुस्लीमाविषयी चिंतीत असता, खर म्हणजे तुम्हाला अल्पसंख्याक मंत्री करायला पाहिजे होते. तुम्ही असे समजु नका की, आमचा कोणी वाली नाही, आमचा कोणी गॉडफादर नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते मुस्लीम समाजाच्या शिक्षणाची, आरोग्याची संपुर्ण विकासाची व संरक्षणाची संपुर्ण जबाबदारी घेत आहेत. मुस्लीम समाजांनी चिंता करण्याचे काहीच कारण नाही. त्यांनी बिनधास्त राहावे.
मुस्लीम समाज हा संकट काळात धावून येणारा समाज आहे. मागे बोट दुर्घटनेत आरिफ बामणे नावाच्या मुस्लीमांने आपल्या जिवाची पर्वा न करता ३५ जणांचे जीव वाचवले, इलाहाबाद येथे कुंभमेळ्यात आगीमध्ये चेंगराचेंगरीत हिंदु भाविक संकटात असतांना तेथील मुस्लीमांनी मशीदी, मदरसे व स्वत:च्या घरामध्ये हिंदु भाविकांना आश्रय दिला त्यांच्या राहाण्या खाण्याची सोय केली, कोरोनाच्या संकट काळात सुद्धा मुस्लीमांनी मशीदी, मदरसे दिले त्या परिस्थितीमध्ये लोक आपल्या जिव वाचवण्यासाठी आप्त स्वकियांना सुद्धा जवळ करत नव्हते, तेव्हा मुस्लीमांनी हिंदु प्रेतांना अग्नी दिली, प्रेताला खांदा दिला, एवढयाच नाहीतर शिकाळ धरण्यांची वेळ आमच्यावर आली. तरी आम्ही न घाबरता सेवा केली तेव्हा तुम्ही कोठे होता ? तसे पाहता आपल्या बोलण्याकडे मुस्लीम समाज जास्त महत्व देत नाही आणि आपल्या बोलण्याला हिंदु समाज किती महत्व देतो हे माहित नाही, हिंदु हा आमचा मोठा भाऊ आहे. आम्ही त्यांचा कायम आदर, मानसन्मान, इज्जत राखणारच आपण महायुती म्हणुन एकत्रित निवडणुका लढवल्या आहेत. आपण एकत्रित सरकार चालवत आहोत. म्हणून या राज्याला पुढे नेण्यासाठी राज्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, राज्यात हिंदु मुस्लीम भाईचारा कायम राहण्यासाठी, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवू नये म्हणून नितेश राणे साहेब तुम्ही मुस्लीम विरोधी वक्तव्य करु नका, आपण या राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात संपुर्ण मुस्लीम समाज आपला मान सन्मान आदर करतो. तेव्हा यापुढे आपण एक भारतीय म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसमावेश देशहिताची विधाने कराल अशी अपेक्षा शेवटी चौधरी यांनी व्यक्त केली.
0 टिप्पण्या