Top Post Ad

थांबण्याची कला..,कौन बनेगा करोडपती मधील एक किस्सा

कौन बनेगा करोडपती मधील एक किस्सा नुकताच माझ्या वाचनात आला. फास्टेस्ट फिंगर राउंडमध्ये पहिले आलेले नीरज सक्सेना हॉट सीटवर बसले. ते शांतपणे बसले होते - न ओरडता, न नाचता, न रडता, अमिताभ यांना मिठी न मारता. नीरज सक्सेना एक शास्त्रज्ञ आहेत, पीएचडी आहेत आणि कोलकात्यातील एका विद्यापीठाचे प्रो-व्हाइस चॅन्सलर आहेत. त्यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करण्याचा मान मिळाला होता. नीरज यांनी खेळ आत्मविश्वासाने सुरू केला, एकदा ऑडियन्स पोलचा वापर केला पण डबल डिप पॉवरमुळे तो लाइफलाइन परत मिळवला. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सहजपणे देत गेले आणि ब्रेकपूर्वी ३.२ लाख रुपये आणि तेवढीच बोनस रक्कम जिंकली.

ब्रेकनंतर अमिताभ पुढचा प्रश्न सादर करू लागले: "चला डॉक्टर, आता अकरावा प्रश्न येत आहे... हा आहे..." पण तेवढ्यात नीरज म्हणाले, "सर, मला थांबायचे आहे." अमिताभ आश्चर्यचकित झाले. एवढा चांगला खेळणारा स्पर्धक, तीन लाइफलाइन्स शिल्लक असताना आणि १ कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा स्पष्ट मार्ग असताना थांबू इच्छितो?
नीरज शांतपणे म्हणाले, "इतर स्पर्धक वाट पाहत आहेत, आणि ते माझ्यापेक्षा लहान आहेत. त्यांनाही संधी मिळायला हवी. शिवाय, मी आधीच चांगली रक्कम जिंकली आहे. मला वाटते जे मिळाले ते पुरेसे आहे. मला अधिकची गरज नाही."
अमिताभ निःशब्द झाले. संपूर्ण स्टुडिओ क्षणभर शांत झाला. मग सर्वांनी उभे राहून त्यांना दीर्घ टाळ्यांची दाद दिली. अमिताभ म्हणाले, "आज तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. एवढा विनम्र माणूस भेटणे दुर्मिळ आहे."
खरं तर, एवढी मोठी संधी असूनही, नीरज यांचा मागे सरण्याचा आणि इतरांना खेळू देण्याचा निर्णय, तसेच जे मिळाले त्यात समाधानी असणे, हे मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. मनातून मी त्याला सलाम केला.
आज लोक पैसा, सत्ता यांच्या मागे अविरत धावत असतात. कितीही कमावले तरी त्यांचे समाधान होत नाही. लोभ कधीच कमी होत नाही. या मागे लागून लोक कुटुंबासोबतचा वेळ, झोप, शांती, प्रेम आणि मैत्री गमावतात. पण अशा वेळी डॉ. नीरज सक्सेना सारखी माणसं आपल्याला मौल्यवान धडे देतात. या काळात आहे त्यात समाधानी असणारी व्यक्ती भेटणे हे दुर्मिळ आणि अमूल्य आहे.
नीरज निघून गेल्यावर एक तरुण मुलगी हॉट सीटवर आली. तिने तिची कहाणी सांगितली: "आम्ही तीन मुली आहोत म्हणून वडिलांनी आम्हाला घराबाहेर काढले. आम्ही आता आश्रमात राहतो..."
जर नीरज थांबला नसते, तर या मुलीला खेळण्याची संधी मिळाली नसती. त्यांच्या त्यागामुळे तिला काही पैसे कमवण्याची संधी मिळाली. आजच्या जगात लोकांना हक्कातला एक पैसाही सोडायचा नसतो. पण हा एक अपवादात्मक प्रसंग होता. जेव्हा तुमच्या गरजा पूर्ण होतात, तेव्हा थांबायचे आणि इतरांना संधी द्यायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्वार्थ सोडल्याने मिळालेला आनंद हा इतरांसोबत वाटून घेता येतो. म्हणून तो अधिक चांगला आनंद असतो !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com