Top Post Ad

मला भारताविषयी फार आस्था आहे.... रोटरी इंटरनॅशनल अध्यक्ष संगकू युन

रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष संगकू युन (दक्षिण कोरिया) यांनी मुंबईला भेट दिली असून, विविध कार्यक्रम आणि प्रकल्पांमध्ये ते सहभागी होत आहेत. संगकू युन हे समाजसेवा आणि जागतिक सहभागासाठी ओळखले जाणारे दूरदर्शी नेते आहेत. आपल्या मुंबई दौऱ्यात त्यांनी आज पत्रकारांना संबोधित केले. मुंबईतील प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी रोटरीच्या कार्याबाबत आणि पुढील वाटचालीबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिले. यावेळी त्यांच्यासोबत रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर  राजू सुब्रमणियन,  रोटरी भूतपूर्व गव्हर्नर  राजेंद्र अग्रवाल, रोटरी जिल्हा गव्हर्नर नामांकित राजन दुआ हे उपस्थित होते. 

 भारत देशाबाबत संगकू यून म्हणाले, मला भारताविषयी फार आस्था आहे. मला भारत देश फार आवडतो. इथली संस्कृती आणि विशेष करून इथले खाद्यपदार्थ हे मला खूप मोहित करतात. इथला पेहराव देखील विशेष असल्याचेही ते म्हणाले. भारतामध्ये काम करण्यासाठी खूप मोठा स्पेस आहे. इथे असलेल्या राहणीमान आणि लोकांचे प्रश्न, सातत्याने बदलत जाणारे वातावरण, पर्यावरण आदी अनेक विषयांवर संगकू यांनी आपले मत व्यक्त केले. 

रोटरी इंटरनॅशनल ही शांतता, सद्भावना आणि शाश्वत समाजविकासाला प्रोत्साहन देणारी जागतिक स्वयंसेवी संस्था आहे. पोलिओ निर्मूलन आणि लसीकरण मोहिमा, शुद्ध पाणी आणि स्वच्छता उपक्रम, शिक्षण आणि युवक सशक्तीकरण, शिष्यवृत्ती, व्यावसायिक प्रशिक्षण आणि नेतृत्व विकास कार्यक्रमांना समर्थन, आपत्ती निवारण आणि समाज पुनर्बांधणी, बालरोग हृदय शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डायलिसिस, कर्करोग उपचार, रक्तदान शिबिरे आणि अन्य वैद्यकीय मदत असे अनेक रोटरीचे प्रमुख प्रकल्प असून यावर आज सविस्तर माहिती देण्यात आली.

रोटरी इंटरनॅशनल ही एक जागतिक मानवतावादी संस्था आहे. रोटरी सरकारला समाजविकासासाठी आमच्या सततच्या योगदानाची दखल घेण्याचे आणि समर्थन करण्याचे आवाहन करते. आम्ही धोरणात्मक पाठिंबा, वाढीव निधी आणि धोरणात्मक सहकार्याची अपेक्षा करतो, जेणेकरून आमच्या उपक्रमांचा प्रभाव आणखी वाढवता येईल. सहकार्याने आपण अधिक सक्षम, न्याय्य आणि समृद्ध समुदाय निर्माण करू शकतो. याकरिता सरकारकडून पाठिंब्याची अपेक्षा असल्याचेही रोटरीचे इंटरनॅशनल डायरेक्टर राजू सुब्रमणियन यांनी सांगितले. 

रोटरी मुंबई जिल्हा 3141 चे 2026-27 चे गव्हर्नर म्हणून. राजन दुआ हे पदभार स्वीकारतील. ते समुदाय विकासातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि दृढ नेतृत्वासाठी प्रसिद्ध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com