वरळी आदर्श नगर कोळीवाडा येथे एस आर ए सागर दर्शन सहकारी गृहनिर्माण हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सध्या पायाभरणीचे काम सुरु आहे. मात्र सदर प्रकल्प बंद पाडण्यासाठी काही समाज कंटकांकडून जाणिवूपर्वक विघ्न उभारण्यात येत आहे. विकासकाला धमकावणे, त्यांच्याकडे खंडणी मागणे असे प्रकार होत आहेत. या विरोधात सोसायटीतील सर्व रहिवाशांसह आज सोसायटीचे समन्व्यक, अध्यक्ष गोविंद कामतेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.
काही समाजकंटकांनी एस आर ए तसेंच पोलीसात तक्रारी करून बिल्डर आकाश गुप्ता मुख्य संचालक चिंताहरणी चिंतपुराणी LLP रिअलेटर्स (सरकार ग्रुप) यांच्यावर दबाव निर्माण केला. तसेच सुरु असलेला प्रकल्प बंद पाडू अशी धमकी देऊन 10 कोटी रुपये खंडणी मागितली. हा प्रकार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी भायंदर येथे घडला. बिल्डर आकाश गुप्ता यांच्या तक्रारी वरून या प्रकरणी चार समाजकंटकाना खंडनीची रक्कम घेतांना रंगे हात अटक केली. यातील एक खंडानीखोर स्वप्रील बांडेकर, हा नालासोपारा येथील माजी नगरसेवक आहे. तर हिमांसू शहा, किशोर काजरेकर, निखिल बोलारे या तिघांना देखील अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपीची सत्र न्यायालय ठाणे यांनी 10 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठाडीत वाढ केली आहे. याबाबत फिर्यादीच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला.हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विकासाकांनी शासनाच्या विविध विभागाच्या सर्व परवानग्या मिळवल्या आहेत. तसेंच 239 रहिवाश्यांना दोन वर्षाचे पूर्ण भाडे दिले आहे, असे असताना हा प्रकल्प इतर एसआरए प्रकल्पाप्रमाणे दिर्घ काळ रेंगाळत रहावा याकरिता विरोधकांची कुटील कारस्थाने सुरु आहेत. याच्या तक्रारी एस आर ए तसेंच इतर प्राधीकरणाकडे करण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प वरळी येथे सुरु आहे मात्र खंडणीखोर भायंदरहून येत आहेत. याचा अर्थ यामागे खरे सूत्रधार वरळी येथील असल्याचा आरोप करीत पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची कसून चौकशी करावी अशी मागणी गोविंद कामतेकर यांनी केली.
वरळी आदर्श नगर, सागर दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.) वरळी, या संस्थेचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्याकरीता मागील 30 वर्षापासून शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. ही पुनर्वसन योजना लांबल्यामुळे रहिवाश्यांना आजवर अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. विभागातील सार्वजनिक शौचालयांची दयनिय अवस्थेमुळे सतत होणारी रोगराई, दाटीवाटीची वस्ती असल्यामुळे मुबलक उजेड वारा मिळत नसल्याची समस्या, लहान 10x12 रुंदीच्या खोली मध्ये संपुर्ण कुटुंबासमवेत वास्तव्य करताना उद्भवणार्या विविध अडचणी गेली अनेक वर्ष येथील रहिवाशी सहन करत आहेत. आज ना उद्या आपला प्रकल्प कार्यान्वित होऊन, "आपल्याला लवकरच नवीन इमारतीत हक्काचे घर मिळेल." हे स्वप्न उराशी बाळगुन कित्येक झोपडीधारकांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. कोरोनाच्या महामारीत झोपडपट्टीमध्ये राहताना फारच भयानक परिस्थिती या रहिवाशांनी अनुभवली आहे.
सन 2020 मध्ये मे. चितांहरणी चिंतपुरनी रिअलर्ट्स एल.एल.पी यांची संस्थेचे विकासक म्हणुन सर्वानुमते निवड करण्यात आली. तेव्हापासुन संस्थेच्या विकासकांनी आजवर उत्तमरित्या कार्य करत पुनर्वसन प्रकल्पाला आवश्यक असलेल्या झोपू. प्राधिकरणाच्या व इतर प्राधिकरणाच्या सर्व परवानगी प्राप्त केल्या व त्यानंतर सर्व झोपडीधारक सदस्यांची सभा बोलावुन विकासकांनी प्राप्त केलेल्या सर्व परवानगी सभेसमोर मांडल्या, त्याअनुषगांने पुनर्वसन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा याकरिता संस्थेचा संपुर्ण भुखंड विकासकांना मोकळा करून द्यावा, असा ठराव सर्वानुमते मंजुर करुन संमत करण्यात आला. सद्यास्थितित संस्थेचे सर्व झोपडीधारक सदस्य भाडेतत्वावर इतरत्र स्थलांतरीत झाले असुन, विकासकामाकरिता सर्व झोपड्या निष्कासित करुन संपुर्ण भुखंड मोकळा करण्यात आला आहे.
विकासक व संस्था नियोजित इमारतीचे बांधकाम करण्यासाठी पुढील वाटचाल करत असताना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाशी काडीमात्र संबंध नसलेली हिना राठोड राहणार कांदिवली व स्वप्नील बांदेकर राहणार नालासोपारा हे प्रकल्पाबाबत अनेक ठिकाणी खोट्या तक्रारी करत आहे. तसेच झो. पू प्राधिकरण व इतर प्राधिकरणाकडे सतत माहिती अधिकाराचा गैरवापर करुन 239 सर्वसामान्य कुटुबियांचा मार्गी लागत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात अडथळा निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करत आहेत. ज्या व्यक्तीचा या प्रकल्पाशी कोणताही संबंध नाही अश्या व्यक्ती पुनर्वसन प्रक्रियेत हस्तक्षेत का करत आहेत? याचा उलघडा होणे फार गरजेचे आहे. या प्रकल्पाशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्ती माहिती अधिकाराखाली विकासकावर दबाव आणत धमक्याद्वारे खंडणी उकळणारी ही टोळी असण्याची दाट शक्यता आहे वर्तवण्यात येत आहे.
याकरिता संस्थेच्या सर्व सदस्यांनी एस.आर.ए.प्रकल्प अधिकारी यांना पत्राद्वारे कळवले आहे की, आमच्या पुनर्वसन प्रकल्पावावत कोणतीही 'तक्रार' अथवा 'माहिती अधिकार अर्ज' प्राप्त झाल्यास, अर्ज करणारी व्यक्ती वरळी आदर्श नगर, सागर दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्थेशी संबंधित आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात यावी व प्रकल्पाशी संबंधित नसलेल्या कोणत्याही व्यक्तीना प्रकल्पाची कोणतीही माहीती पुरविण्यात येऊ नये व अश्या व्यक्तींनी पुनर्वसन प्रकल्पात बाधा आणण्याच्या दृष्टीकोनातुन दाखल केलेल्या कोणत्याही स्वरुपाचे अर्ज/तक्रारीची याची आपल्या मार्फत दखल घेऊ नये. अन्यथा संस्थेच्या वतीने संबंधित व्यक्ती विरोधात मोर्चा काढून जनआंदोलन केले जाईल याची आपण गंभीर नोंद घ्यावी
0 टिप्पण्या