शहीद सोमनाथ सुर्यवंशी, लोकनेते विजय वाकोडे कुटुंबांना न्याय मिळवून देणे व निरपराध तरुण महिलांवर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे. आंदोलनकर्त्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत .पोलिसांच्या कोबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन तसेच सीआरपीसी अन्वये चौकशी करावी. परभणी प्रकरणी सरकारने येत्या ३ मार्च पर्यंत आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी विधानसभेला घेराव देखील घालण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी आज दिला. या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आणि स्लम सेल विभाग मुंबई अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस, अनुसूचित जाती विभाग मुंबई अध्यक्ष कचरु यादव, महासाचिब महेंद्र मुणगेकर, रमेश कांबळे, राज वाल्मिकी, व इतर उपस्थित होते.

परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची सोपान निवृत्ती पवार या इसमाने तोडफोड विटंबना केल्याची घटना डिसेंबर महिन्यात घडली होती यामुळे समस्त आंबेडकरी व संविधान प्रेमी समाजामध्ये असंतोष निर्माण झाला होता या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी पोलीस प्रशासनाच्या परवानगीने परभणी बंदचे आवाहन करण्यात आले या बंदला शहरातील व्यापा-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही जमेची बाजू आहे परंतु ज्या ठिकाणी हे धरणे आंदोलन संविधानिक मार्गाने चालू होते त्या ठिकाणी या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी काही समाजविघातक शक्तीकडून या बंदला हिंसक वळण लागले आंदोलन शमविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रुधुराच्या कांड्या फोडल्या व आंदोलन शांत झाले परंतु त्यानंतर सायंकाळी पोलिसांनी कारस्थान पूर्वक कोंबिंग ऑपरेशन करून आंबेडकरी वस्त्यांमध्ये कार्यकर्ते, महिला एवढेच नाही तर अल्पवयीन व वयोवृद्ध ही ताब्यात घेऊन अमानुषपणे मारहाण करण्यात आली कोंबिंग ऑपरेशन मध्ये ज्यांना ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये एक सोमनाथ व्यंकटेश सुर्यवंशी या विधीशास्त्राच्या विद्यार्थ्यांचाही सहआग होता कुठल्या निकषांच्या आधारे धरपकड करण्यात आली आणि संविधानप्रेमीना डांबुन टाकण्यात आले
दुसऱ्या दिवशी आंदोलकांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली या कस्टडीमध्ये आंदोलकांना पोलिसांनी प्रचंड मारहाण केली यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा समावेश होता तिसऱ्या दिवशी न्यायालयाने या आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर पंधरा तारखेला या कस्टडीमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा अमानुष मारहाणीमुळे मृत्यू झाला औरंगाबाद येथील फॉरेन्सिक लॅबचा तसा अहवाल ही उपलब्ध झाला आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी शांततेत निषेध आंदोलन करणारे आंबेडकरी लोकनेते विजय वाकोडे यांचा सुद्धा या आंदोलन दडपशाहीमुळे मानसिक धक्याने हृदय विकाराने मृत्यू झाला. याशिवाय शेकडो निरपराध तरुण, महिलांची पोलीसानी धरपकड करून अटक केली होती विविध पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या वर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. एकूणच घटनाक्रम लक्षात घेता परभणी प्रकरणी खालील प्रमुख मागण्याची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा मंत्रालया समोर यावी आंदोलन करण्यात येईल याची दखल घेण्यात यावी.
- १) पोलिसांच्या कोबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी
- 2) कलम 176 (1A) सीआरपीसी अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी.
- 3) न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधिशाकडून न करता सिटींग न्यायाधिशामार्फत करावी
- 4) पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह पोलीस निरीक्षक मरे आणि तुरणार व इतर पोलीस अधिका-यांवर कलम ३२ अन्वये, अट्रॉसिटी कायद्यान्वये कलम 3 (1) आणि 3(2) प्रमाणे गुन्हे दाखल करावेत सोबतच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
- ५) परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही जप्त करून ते सीसीटिव्ही तपासावे
- ६) शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी शासनाने तातडीने १ कोटींची आर्थिक मदत करावी
- ७) सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तिस तातडीने शासकीय नोकरी देवून त्यांचे पुर्नवसन करावे
- ८) शाहिद लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबातील मुलाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे
- ९) सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेला मारहाण करणाऱ्या वच्छलाबाई मानवते व इतर आंबेडकरी युवकांना मारहाण करणान्या पोलिसांवर तातडीने 354, 307 अंतर्गत गुन्हे दाखल करुन त्यांना निलंबीत करावे
- १०) वच्छलाबाई मानवते यांना सरकारने १० लाख रुपयाची आर्थिक मदत करून त्यांचे पुर्नवसन करावे
- ११) आंदोलन कर्त्याना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी
- १२, पोलिसांच्या कोबिंग कारवाईत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
- १३) संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याची नार्को टेस्ट करण्यात यावी या घटनेचा सूत्रधार यास तात्काळ अटक करण्यात यावी
- १४) १० डिसेंबर २०२४ रोजी पार पडलेला सकल हिंदू समाज मोर्चातील संयोजक यांची चौकशी करावी यासोबत त्या मोर्चातील सर्वांची भाषणे तपासून त्यांच्यावर कारवाई करावी
- १५) संविधान सन्मानार्थ शहीद झालेल्या कायद्याचा विद्यार्थी सोमनाथ व्यंकटेश सुर्यवंशी यांचे परभणी येथे स्मारक निर्माण करून करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा
- अशा मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.३ मार्च पुर्वी या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण आंबेडकरी संस्था संघटनांना एकत्र करून विधानसभेला घेराव घालण्यात येईल असे हत्तिअबिरे यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या