बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली होती. या मागणीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून तर, अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र संभाजी ब्रिगेडने या नियुक्तीला विरोध केलाय. उज्ज्वल निकम सत्ताधारी पक्षासोबत आहेत, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, आंदोलन करूनचं न्याय मिळणार असेल तर, आम्ही तेही करायला तयार आहोत.
"" संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर आनंद व्यक्त करण्याआधी सत्यता पाहिली तर असे लक्षात येते. 29 सप्टेंबर 2006 रोजी नागपूर पासून 37 किलोमीटर अंतरावर तुमसर तालुक्यातील खैरलांजी गावामध्ये भोतमांगे हत्याकांड घडले होते.सिद्धार्थ गजभिये या गावातील एका दलित व्यक्तीचे शेतातील रस्त्यावरून स्थानिकांशी भांडण झाले. हल्ल्यातून बचावलेल्या गजभियेने कामठी गावात जाऊन पोलिसात तक्रार दिली आणि या तक्रारीमध्ये साक्षीदार भैयालाल भोतमांगे आणि सुरेखा भोतमांगे झाले. गावकऱ्यांनी राग मनात धरला आणि भोतमांगेच्या झोपडीवर हल्ला चढवला ज्यात पत्नी सुरेखा मुलगी प्रियांका आणि दोन मुलं रोशन आणि सुधीर यांच्या हत्या झाल्या. अल्पवयीन प्रियंका हिच्यावर अमानुष सामूहिक बलात्कार करून हालहाल करून मारले गेले. या प्रकरणात सरकारी वकील नेमले होते उज्वल निकम. एका दलित कुटुंबाला इतके हाल हाल करून अत्यंत क्रूर पद्धतीने मारले. ही केस देशात नाही तर संपूर्ण जगात गाजली. UNO अर्थात आंतरराष्ट्रीय संघटनेच्या पटलावर या केसची चर्चा झाली. मात्र या केस मध्ये साधी ॲट्रॉसिटी लागली नाही. या प्रकरणात एकूण 40 आरोपी होते. चाळीस वरून त्यांची संख्या 11 वर गेली. फाशीची शिक्षा कुणालाही झाली नाही. खटला चालू असतानाच 11 पैकी दोघांचे मृत्यू झाले. कुटुंबातला शेवटचा माणूस भैय्यालाल न्याय मागता मागता 2017 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावला.- प्रा सुषमा अंधारे
- उपनेता तथा प्रवक्ता शिवसेना UBT
0 टिप्पण्या