गोरेगाव पश्चिमेकडील वॉर्ड क्रमांक ५५ मध्ये असलेल्या साने गुरुजी नगर पुनर्विकास योजना लांबणीवर पडली आहे, आता तर म्हाडा उपनिबंधक बी एस कटरे यांनी साने गुरुजी नगर येथील पाचही सोसायटी कमिट्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, हे प्रकरण काही राहिवासीयांनी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष गौरव राणे यांच्याकडे घेऊन गेल्यावर गौरव राणे यांनी उपनिबंधक बी एस कटरे यांना पत्र लिहून साने गुरुजी नगर मधील पुनर्विकासाच्या प्रक्रियेतील भ्रष्टाचार व वादग्रस्त वास्तूविशारद निखिल दिक्षीत यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे, सदर वास्तूविशारद निखिल दिक्षीत यांने खोटा विकासाचा आराखडा तयार करून आपल्या मर्जीतील रोमेल विकासकाची नियुक्ती केली, रोमेल विकासकावर गोरेगाव कोव्हीड नेस्को घोटाळ्याचे आरोप असून ईडी चौकशी सुरू आहे, रोमेल विकासकाने कोणतीही बँक गॅरेंटी दिली नाही असे असताना सोसायटी कमिट्यांनी रहिवाशांकडून सह्या कशा घेतल्या ? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.
मध्यंतरी रोमेल विकासक ९ महिने तुरुंगात होता, सध्या जामिनावर आहे , तसेच या सर्व भ्रष्ट टेंडर प्रक्रियेविरोधात साने गुरुजी नगर येथील रहिवासी गंगाराम भोईर, येसुदास चेट्टीयार, गणेश विचारे,विनीत गुप्ते, प्रमोद निब्दे यांनी नवी दिल्ली आर्किटेक्ट काउंसिल येथे याचिका दाखल केली होती , त्या याचिकेचा पहिला निकाल रहिवासीयांच्या बाजूने आला , निखिल दिक्षीत यांना काउंसिलने कारणे दाखवा नोटीस बजावली व आपण आर्किटेक्ट नाही त्यामुळे सर्व वृत्तपत्रातून याबाबत जाहीर करण्याचे आदेश दिले ,त्यावर उत्तर देताना निखिल दिक्षीत यांनी आर्किटेक्ट काउंसिलची जाहीर माफी मागितली. तसेच मी यापुढे आर्किटेक्ट पदवी कधीही लावणार नाही असे जाहीर केले आहे, निखिल दिक्षीत स्वतः वास्तूविशारद नाहीत त्यामुळे त्यांच्या गेल्या २२ वर्षांच्या सर्व कामांची चौकशी करावी अशी मागणी गौरव राणे यांनी केली आहे, तसेच निखिल दिक्षीत वास्तूविशारद नसताना म्हाडाने त्याला बेस्ट आर्किटेक्ट पुरस्कार कशाच्या आधारे दिला. तसेच म्हाडाच्या आर्किटेक्ट पॅनल वर कसा असा सवाल गौरव राणे यांनी उपस्थित केलाय,निखिल दिक्षीत गेले २२ वर्षे आर्किटेक्ट म्हणून वावरत असताना त्याने केलेल्या सर्व प्रकल्पांच्या आर्थिक घोटाळ्यांची कसून चौकशी करावी यासाठी येथील रहिवासी लवकरच ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्स विभागात सविस्तर लेखी तक्रार करणार आहेत ,गौरव राणे यांच्या तक्रारीची उपनिबंधक बी एस कटरे यांनी गंभीर दखल घेतली असून साने गुरुजी नगर मधील त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था, मिलन सहकारी गृहनिर्माण संस्था ,ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था, श्री स्वामी समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्था, अलंकार सहकारी गृहनिर्माण संस्था यांना नोटीस बजावली असून आता सोसायट्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल , तसेच लवकरच गौरव राणे वास्तूविशारद निखिल दिक्षीत व विकासक रोमेल यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत
0 टिप्पण्या