Top Post Ad

यशोमंदिर सहकारी पतपेढीची बेकायदेशीर वसुली

 बेकायदेशीर वसुली करणाऱ्या यशोमंदिर सहकारी पतपेढी शाखा घाटकोपर पूर्वचे वसुली अधिकारी ए बी नरवडे यांना आंदोलनाचा इशारा - डॉ.सुरोसे

मुरबाड तालुक्यातील प्रेमदास धनगर यांच्याकडून महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे आलेल्या तक्रारीनुसार यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा घाटकोपर यांच्या कार्यालयात भेट दिली. भेटीदरम्यान वसुली अधिकारी नरवडे यांच्याशी झालेल्या प्रकाराबाबत चौकशी केली असता खरोखरच पतसंस्थेतील अधिकारी व कर्जदार यांच्या संगनमताने जामीनदार श्री. धनगर यांची शंभर टक्के फसवणूक केलेली आहे हे सिद्ध झाले आहे. पतसंस्थेने कर्जदारास गृहकर्ज रजिस्ट्रेशन करून दिलेले आहे. परंतु ज्या घरावर कर्ज दिले ते घरच अस्तित्वात नाही. शिवाय कर्जदार यांचे कर्ज घेतल्यापासून सहा वर्षानंतर निधन झाले आहे त्यांचा कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स कव्हरेज पतसंस्थेने घेतलेले नाही असे खोडसाळ प्रकार या पतसंस्थेकडून केलेला आहे कर्जदारास सन २००२ मध्ये २ लाख ३० हजारचे कर्ज दिलेले आहे त्या कर्जाची वसुली आतापर्यंत जामीनदार यांच्याकडून ५ लाख ५० हजाररुपये वसूल केले आहेत. तरी त्यांच्यावर शिल्लक रक्कम ५ लाख ३० हजार रुपये बाकी दाखवत आहेत. पतसंस्थेकडून केलेल्या बेकायदेशीर एकतर्फी कारवाईबाबत येत्या आठ दिवसात न्याय द्यावा अन्यथा आठ दिवसानंतर आंदोलन करणार असा इशारा संघटनेचे प्रदेश संघटक तथा ठाणे जिल्हाध्यक्ष डॉ. धनाजी सुरोसे यांनी दिला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com