Top Post Ad

दिल्लीतील अ.भा. मराठी साहित्य संमेलनात प्रथमच मुंबई मराठी पत्रकार संघाचा स्टॉल

  •  मराठी पत्रकारांच्या साहित्याचा ठसा दिल्लीत उमटणार
  • दिल्लीतील अ.भा. मराठी साहित्य संमेलनात प्रथमच मुंबई मराठी पत्रकार संघाचा स्टॉल
  • सदस्य पत्रकारांच्या साहित्यकृतींचे लक्षवेधी प्रदर्शन
  • मुंबई मराठी पत्रकार संघाचा स्टॉल क्रमांक असणार ९४

मराठी पत्रकारांच्या हितासाठी सातत्याने सक्रीय असणाऱ्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आणि मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासातील एक आगळावेगळा योग यंदा दिल्ली येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जुळून आला आहे. मराठी पत्रकाराच्या साहित्याचा ठसा आता थेट दिल्लीत उमटणार आहे. पत्रकार संघाच्या सदस्यांच्या सर्जनशील प्रतिभेचे धुमारे वाचकांसमोर आणणाऱ्या पुस्तकांचे म्हणजेच आपल्या मान्यवर सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे एक प्रदर्शन मुंबई मराठी पत्रकार संघाने या संमेलनस्थळी आयोजित केले आहे. पत्रकार संघासाठी नवनवीन उपक्रमांची आखणी आणि आयोजन करणाऱ्या विद्यमान कार्यकारिणीच्या सक्रीय पाठबळामुळे हे आयोजन होत आहे. संमेलनाची आमंत्रक संस्था सरहद आणि संस्थेचे प्रमुख संजय नाहर यांनी अत्यंत आपुलकीने या आयोजनासाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे.

 दिल्लीत तालकटोरा स्टेडियम येथे दि. 21 ते 23 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत संपन्न होणाऱ्या साहित्य संमेलनात आपल्या पत्रकार संघाचा लक्षवेधी स्टॉल साहित्यप्रेमींचे लक्ष निश्चितच वेधून घेणार आहे. पत्रकार संघाचे सदस्य असलेल्या पत्रकारांनी लिहिलेले प्रत्येकी एक पुस्तक या स्टॉलवर असावे, असे आयोजन करण्यात येत आहे. या स्टॉलची जबाबदारी पत्रकार संघाचे अंतर्गत हिशोब तपासनीस प्रा. हेमंत सामंत आणि सदस्य राजेंद्र साळस्कर हे सांभाळणार आहेत. या प्रदर्शनात मांडण्यासाठी सदस्यांनी 'आपल्या पुस्तकांपैकी कुठल्याही एकाच पुस्तकाची प्रत' दि. १६ फेब्रुवारी पर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आणून द्यावी असे आवाहन संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि  कार्यवाह शैलेंद्र दिनकर शिर्के यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com