Top Post Ad

जय शिवाजी.. जय भारत'च्या जयघोषाने दुमदुमले ठाणे शहर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 जयंतीनिमित्त ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या जयशिवाजी जय भारत या 6 कि.मी अंतराच्या पदयात्रेस ठाणेकर नागरिकांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जय शिवाजी जय भारत अशा घोषणा देत संपूर्ण पदयात्रेचा परिसर हा दुमदुमून गेला. चार हजारांहून अधिक नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते.

       यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, मनीष जोशी, सचिन सांगळे, मधुकर बोडके, शंकर पाटोळे, दिनेश तायडे प्र. उपआयुक्त मीनल पालांडे, अग्निशमन दल प्रमुख गिरीष झळके, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.


     भारत सरकार, युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे शहरातून सकाळी 7.30 वा. शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावरुन या पदयात्रेची सुरूवात करण्यात आली. तेथून  मारोतराव शिंदे तरणतलाव, दत्त मंदिर घाट, प्रभात सिनेमा‍ सिग्नल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रंगो बापूजी गुप्ते चौक, टेंभीनाका, कोर्टनाका, सेंट्रल मैदान, ठाणे जिल्हा कारागृह, जी.पी.ओ, सिव्हील हॉस्प‍िटल, सिग्नाँग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, खोपट सिग्नल, अल्मेडा चौक, महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी प्रशांत कॉर्नर, आराधना टॉकीज चौक पु.ना. गाडगीळ चौक, तलावपाळी येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे ही पदयात्रा विसर्जित करण्यात आली. या पदयात्रेत सर्व शासकीय आस्थापनांचे अधिकारी/ कर्मचारी, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, एन.एस.एस, सामाजिक संस्था, ट्रस्टमधील सर्व व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पटांगणावर शालेय विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांची ‍प्रात्याक्षिके सादर केली.

             तद्नंतर विविध क्रीडाप्रकारात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आदी मान्यवरांच्या बॅडमिंटनपटू व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त श्रीकांत वाड, कबड्डी या क्रीडाप्रकारात अर्जुन पुरस्कारप्राप्त करणारे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, कबड्डी मध्ये शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणाऱ्या महापालिकेच्या प्र. उपआयुक्त मीनल पालांडे, अद्वैता मांगले, विदयमान बॅडमिंटनपटू दीप सांभीया, मालविका बनसोड, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी निलेश साळुंके, रिदमिक ‍जिम्नॅस्टिकपटू व आंतरराष्ट्रीय पंच पुजा सुर्वे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी श्रध्दा तळेकर, वेटलिफ्टींग खेळाडू मधुरा सिंहासने, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांना सन्मानित करण्यात आला.

*आजचा दिवस वीरश्रीचा : जिल्हाधिकारी अशोक शिनगारे*

छत्रपती शिवाजी महाराज, जय शिवाजी जय भवानी हे शब्द उच्चारताच प्रत्येकामध्ये वीरश्री संचारते. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहात आपण सर्वांनी साजरी केली. आजचा दिवस हा वीरश्रीने भारलेला असून ही प्रेरणा आपल्याला सतत उर्जा देणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्वाचा आलेख डोळ्यांसमोर आला की आपल्याला स्फुरण चढते त्यामुळे ‍शिवजयंतीच्या दिवसाला वेगळे महत्व असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी केले. शिवछत्रपतींचा इतिहास हा नव्या पिढीपर्यंत दिमाखात पोहचावा, यासाठी यावर्षी पदयात्रा काढण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ठाणे महापालिकेने या कार्यक्रमाचे आयोजन भव्यदिव्य प्रमाणात केल्याबद्दल महापालिकेचे कौतुक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com