Top Post Ad

क्लस्टर योजना विकासकांना आंदण ? - आमदारांचा सरकारला घरचा आहेर

ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक, अतिधोकादायक अन् अनधिकृत इमारती आणि झोपडपट्टयाच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतीकारक आहे. मात्र, आतबट्टयाचे व्यवहार करून प्रशासनाने क्लस्टर योजना विकासकांना आंदण देऊ नका. असे परखड बोल आमदार संजय केळकर यांनी सुनावले आहेत. याचा अर्थ ही योजना विकासकांसाठीच राबवण्यात येत असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे. मात्र गुरुवारी आ. केळकर यांनी नागरीकांसमवेत ठाणे महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत विस्तृत चर्चा केली. आणि ही योजना ठाण्याच्या विकासाकरिताच राबवण्यात यावी असे सक्त निर्देश दिले. मात्र यामुळे ठाण्यात सरकारला घरचा आहेर देण्याचे काम आमदार महोदयांनी केल्याची चर्चाही रंगली आहे. 


  भाजप - शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध भागात ४८ नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले. क्लस्टर सारख्या महात्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप मिळत असताना शहरातील मानपाडा, अशोक नगर, आझादनगर, गणेश नगर तसेच मनोरमा नगर भागात कार्यालय थाटुन दंडेलशाही करणाऱ्या विकासकाच्या विरोधात नागरीकांमध्ये क्लस्टर बाबत संभ्रमाचे वातावरण आहे. यापूर्वी अधिवेशनात आ. केळकर यांनी अशा हजारो झोपडीधारकांची बाजू ठामपणे मांडली असल्याने या भागातील नागरीकांनी क्लस्टर संदर्भातील तक्रारींचा पाढा आ. संजय केळकर यांच्याकडे वाचला. त्यानंतर, गुरुवारी  २० फेब्रुवारी रोजी आ. केळकर यांनी नागरीकांसह थेट ठाणे महापालिका मुख्यालयात संबधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी, नागरीकांनीही अधिकाऱ्यांकडे क्लस्टर संदर्भातील शंका मांडल्या. यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर क्लस्टरसाठी झोपड्यांचे सर्वेक्षण म्हणजे अंतिम मंजुरी नसल्याचा विश्वास रहिवाश्यांना दिला. तसेच क्लस्टरविषयी शंका असेल तर प्रशासनाने जाहिर सभा अथवा बैठका घेऊन रहिवाश्यांचे शंका निरसन करावे. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरही तक्रारदारांच्या तक्रारी ऐकुन घ्याव्यात. असे सक्त निर्देश देत क्लस्टर योजना विकासकाला आंदण देऊ नका, असे प्रशासनाला बजावले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com