महात्मा फुले यांच्या साहित्य संस्कृती विषयक भूमिकेवर आधारित विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मणी मराठी साहित्य संमेलनाच्या समोर त्याच दिवशी त्याच तारखांना व अनेकदा समोरासमोर करण्यात आले आहे. यावर्षी देखील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे मात्र विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या साहित्यिक राजधानीत होत आहे . नाशिक उदगीर, वर्धा व अमळनेर या ठिकाणी कोट्यावधींचा खर्च करूनही मंडपातील रिकाम्या खुर्च्यामुळे खजील झालेले अखिल भारतीय ब्राह्मणी मराठी साहित्य संमेलन आता दिल्लीश्वरांच्याच नाही तर एका राजकीय पक्षांच्या आश्रयाला गेले असल्याचे स्पष्ट मत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी आज व्यक्त केले. अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या बाबत अधिक माहिती देण्याकरिता मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
विद्रोही साहित्य संमेलन मराठी मातीत पाय रोवून विषमतावादी शोषक संस्कृतीच्या विरोधात फुले शाहू आंबेडकरी भूमिका घेऊन खंबीरपणे लढत आहे म्हणूनच १९ वे अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील आमखास मैदानात मलिक अंबर नगरीत २१,२२ व २३ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात मराठी साहित्यिक, नाट्य कलावंत, लोककलावंत कवी, नाटककार, ललित लेखक, १०,००० दहा हजार हून अधिक रसिक फुले शाहू आंबेडकरी, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी, कामगार व विद्यार्थी चळवळीतील तसेच आदिवासी क्षेत्रात काम करणारे संविधानिक मूल्यांसाठी लढणारे कार्यकर्ते यांचेसह सहभागी होणार असल्याचे स्वागताध्यक्ष इंजिनीयर सतीश चकोर यांनी जाहिर केले.
सत्यशोधक समाजाचे १५१ वर्ष भारतीय प्रजासत्ताकाचे ७५ वर्ष यानिमिताने होणाऱ्या एकोणिसाव्या विद्रोही मराठी संमेलनाच्च्या अध्यक्षपदी मराठीतील लोकसाहित्य, संस्कृती व प्राच्यविद्या अभ्यासक, इतिहास संशोधक, भाषा तज्ञ, विचारवंत डॉ अशोक राणा यांची तर उद्घाटकपदी ख्यातनाम आंबेडकरवादी हिंदी साहित्यिक समीक्षक, अनुवादक, विचारवंत कंवल भारती (दिल्ली) असणार आहेत. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे आम खास मैदानावर उभारलेल्या मलिक अंबर साहित्य नगरीत २ भव्य सभा मंडप असून ३ दालनांमध्ये बालमंच, युवा मंच यासह एकूण ४ विचार मंचावर विद्रोहीचे विविध कार्यक्रम बहरणार आहेत. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला व बिस्मिल्ला या दोन नाटकांसह पुढील दोन दिवसांमध्ये विद्रोहीत ६ परिसंवाद, १४ गटचर्चा १ विशेष व्याख्यान होईल. ४ काल्य संमेलने व १ काव्य पहाट मैफिल, १ गझल संमेलन असेल. २ सत्रात साहित्यिक, विचारवंत, पत्रकारांशी साहित्य संवाद होईल, सांस्कृतिक व कला प्रकारात आदिवासी गाणी कला दर्शन, लोककलांचे सादरीकरण व महाराष्ट्र दर्शन इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. कथाकथनांच्या कार्यक्रमासह २ नाट्यवाचन, ३ एकपात्री प्रयोगासह २ एकांकिकेचे सादरीकरण या मंचावर होणार आहे. युवा रॅप कलाकारांचे रॅप गीतांचे सादरीकरण लक्षवेधी ठरेल.खास मंडपातील ८ कला दालनात चित्रकात्य शिल्पकला, सुलेखन, चित्रकला, कलात्मक फलकलेखन, रांगोळी, व्यंगचित्र अशा ८ कला प्रकारांचे लाईव्ह सादरीकरण व प्रदर्शन होईल. संविधान आणि स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान या विषयावरील २ पोस्टर प्रदर्शन भरवण्यात येईल..महाराष्ट्रातील कथा, कविता, नाटक, ललित इल्यादी साहित्य प्रकारातील २०० हून अधिक निमंत्रित साहित्यिक उपस्थित राहणार असून २१ जिल्ह्यातील ७५ लोकशाहीवादी विचारवंत, अभ्यासक, १० कथाकथनकार आणि ४ इतिहासकार, १५ गजल कार, यांसह ३५ नाट्य व सिनेमालिका अभिनेते, एकपात्री नाटककार, एकांकिका नाट्यछटाकार, १२२ निमंत्रित कवी साहित्य नगरीत आपल्या विविध कार्यक्रमाच्या सहभागातून साहित्य प्रेमींसाठी मेजवानी घेऊन येतील. महाराष्ट्रातील बौद्ध, वारकरी, महानुभाव, लिंगायत, आदिधर्म इत्यादी पाच धर्मपीठांचे प्रमुख प्रतिनिधी, २७० लोककलाकारांसह १५ गायक शाहीर, भीमगीतकार, रैंप कलाप्रकारातील ७ युवा कलाकार, बोलीभाषांचे २०अभ्यासक, ७ नामवंत पत्रकार आणि विद्रोहाच्या लेखणीची तोफ तयार करणारे चित्रकार राजानंद सुरडकर व शिल्पकार विकास सरवदे कलाकारासह ७ शिल्पकार, १ व्यंगचित्रकार, यांसह २ चित्रकाव्य कर्त. ५ चित्रकार, ४ पौत्त्टर प्रदर्शनकार, २ सुलेखनकार, २ फलवा लेखन कार आपले योगदान देवून साहित्य चळवळीचा जागर यशस्वी करणार आहे.
संमेलनात माजी संमेलनाध्यक्ष डॉ प्रतिभा अहिरे, डॉ प्रल्हाद लुटलेकर, डॉ वासुदेव मुलाटे, गणेश विसपुते मार्गदर्शन करणार आहेत तसेच
१) भारतीय जाती व पुरुषप्रधान विषमतेला धर्म आणि संरकृतीच्या आधारे दूर करता येणे शक्य आहे,
२) बोलीभाषा, प्रमाणभाषा, अभिजात भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण,
३) सोसल मीडिया अन्यायाविरुद्ध लढण्याचे साधन ?
४) अंधकारमय काळात नवे विषय नवी आव्हाने नवे लेखन साहित्यिकांशी संवाद
५) इतिहासाचे विकृतीकरण विरुद्ध सत्य इतिहास कथन या पाच विषयांवरील परिसंवाद होणार.
अरविंद सुरवाडे, प्रा. मोहन बाबुळगावकर, प्रभू राजगडकर, धर्म कीर्ती महाराज परभणीकर, कोरनेश्वर आप्पाजी, डॉ वंदना महाजन, डॉ देवेंद्र इंगळे, डॉ दिलीप चव्हाण, डॉ. लीलाधर पाटील, डॉक्टर पी टी गायकवाड, डॉअशोक नरनवरे, डॉ शिवाजी उसे, संध्या नरे पवार, एडवोकेट वैशाली डोळस, प्राचार्य संजय मुन, प्रा हटकर कोंडबा, सुनीता भोसले, शाहू पाटोळे, छाया बेले, डॉ मारुती कसाब, आशा डांगे, डॉ. नवनाथ गोरे हे मान्यवर सहभागी होणार आहेत
0 टिप्पण्या