– विचारांशी असलेल्या कटिब्ध्दता हीच सतिश मराठेंची खरी ओळख आहे. या वैचारीक आधिष्ठानामुळेच सहाकार भारतीच्या माध्यामातून सहकाराचे बीज ते रोवू शकले असे प्रतिपादन आर एस एस चे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक सतिश मराठे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस मुंबईत दिमाखात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
दादर पुर्व येथील श्री. स्वामी नारायण मंदिर सभागृहात या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भैय्याजी जोशींसहीत इफ्कोचे प्रबंध संचालक उदय शंकर अवस्थी आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी या सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी मानपत्र देऊन सतिश मराठे यांचा सत्कार करण्यात आला.
सतिश मराठेंच्या सहकार क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात उजाळा दिला.
सत्काराला उत्तर देताना सतिश मराठे यांनी देशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे. सहकारच नव्हे तर विविध क्षेत्रात नवनिर्माणासाठी युवापीढीने पुढाकार घेतला पाहिजे असे सांगितले. मी आयुष्यभर स्वत: तसा प्रयत्न केला, सहकार भारतीने अशी कार्यकर्त्यांची फळी यापुढे देशात उभारण्यावर भर द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक सतिश मराठे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस मुंबईत दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी आर एस एस चे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशींसहीत इफ्कोचे प्रबंध संचालक उदय शंकर अवस्थी आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी या सोहळ्यास उपस्थित होते.
0 टिप्पण्या