भारतातील सर्वात संवेदनशील असलेल्या अयोध्या खटल्याबाबतचा निकाल सन २०१९ मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पाच न्यायमुर्तींच्या खंडपीठात न्या.डाॅ.चंद्रचूड यांचा समावेश होता. याबाबत भाष्य करताना न्या.डाॅ.धनंजय चंद्रचूड यांनी अयोध्या निकालापुर्वी मार्ग सुचत नव्हता, त्यामुळे आम्ही देवापुढे बसलो होतो असे वक्तव्य कनेरसर येथील २० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या सभेतील भाषणात केले. हिंदु व मुस्लीम धर्मातील खटल्याबाबत असे विधान त्यांनी तब्बल पाच वर्षांनी केले होते. गुणवत्तेऐवजी देवाला मार्ग विचारत आहे या त्यांच्या विधानामुळे देशभरात टीका झाली होती. याबाबत सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रातून बातम्याही प्रसिध्द झाल्या होत्या. मात्र न्यायाधीश महोदयांनी आपल्या या वक्तव्याचे एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खंडन केले आहे. खंडन करताना त्यांनी याचे खापर प्रसिद्धी माध्यमांवर फोडले आहे. त्यांनी केलेले हे वक्तव्य व्हिडिओ रूपात आजही कवेसर येथील रहिवाशी अशोक टाव्हरे यांच्याकडे आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी अशोक टाव्हरे यांनी प्रसिद्धी माध्यमांची संवाद साधला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
. मा.सरन्यायाधीशयांनी राममंदिर निकालापुर्वी देवापुढे बसणे, प्रार्थना करणे याचा स्वयंस्पष्ट व्हीडीओ आहे. भारताचे मा.सरन्यायाधीश डाॅ.धनंजय चंद्रचूड यांनी देशापुढे कनेरसर ता.खेड जि.पुणे येथील सभेत अयोध्येबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हीडीओ सर्वत्र व्हायरल झालेला असताना अचानक बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका बदलण्याचे सरन्यायाधीशांनी कारण काय असा सवाल तावरे यांनी उपस्थित केला आहे. सदर वक्तव्य आपण केले नसल्याचे सांगत यावरून निर्माण झालेला संभ्रम दुर करून सत्य काय आहे ते देशाला सांगावे अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांनी व्यक्त केली.इतकेच नव्हे तर काही काळापूर्वी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढण्याचे ऐतिहासिक कार्य सरन्यायाधीश यांनी केले होते मात्र मा.सरन्यायाधीश डाॅ.चंद्रचूड यांच्या कनेरसर येथील सभेत महिला अत्याचार प्रकरणातील आरोपीचा मुक्त वावर होता, त्यांच्या भाषणावेळी हा तथाकथित आरोपी त्यांच्या मागे उभा होता, टाव्हरे यांनी याबाबत दोषींवर कारवाईची मागणी केली होती; परंतु सरकारी कार्यक्रम नव्हता असे सांगून टाळाटाळ करण्यात आली. यावरून असे दिसते की गडावरची पट्टी निघाली मात्र पाठीमागे उभा असलेला आरोपी दिसू शकला नाही असे स्पष्ट मत टाव्हरे यांनी व्यक्त केले
0 टिप्पण्या