चाळीस आमदार ठाकरेंना सोडून भाजपसोबत गेले.युती बनवून सरकार बनवले.ठाकरेंनी पक्षांतरकायदा अनुसार निवडणूक आयुक्त आणि सुप्रीम कोर्टात खटला दाखल केला.अपील होते कि, सोडून गेलेल्या आमदारांना अपात्र केले जावे.ते तीन वर्षांत झाले नाही ..त्यांच्या लेखी या आमदारांनी फक्त दुकानांची जागा बदलली.पक्ष बदललाच नाही. म्हणून यांना पक्षांतरविरोधी कायदा लागू होत नाही. शिवसेनेचे चाळीस आमदार सोडून,पळून गेले.असे जरी वरकरणी वाटत असले तरीही जनतेच्या लक्षात आले आहे कि,या आमदारांनी पक्षांतर केले नसून त्यांनी त्यांचे दुकान ठाकरे कॉम्प्लेक्समधून फडणवीस कॉम्प्लेक्समधे स्थलांतर केलें आहे.साहजिकच आहे.जेथे नफा जास्त होईल तेथे दुकान हलवणार.
चाळीस आमदार शिवसेना सोडून गेले आहेत.आजही सोडून जात आहेत.याचे खूप दुःख होते.पण या दुखाची कारणे शोधून इलाज केला जात नाही.फक्त रडतात.बोटे मोडतात.शिव्याश्राप देतात. मुळातच शिवसेनेत सेवाभावी राजकारण करणाऱ्यांना सोबत घेतले नाही.दारूवाले,रेती वाले,टपरीवाले, चाकू सुरीवाले, पिस्तूल वाले,सावकार,वसुली मास्टर,कमीशन खोर अशाच लोकांना प्रवेश दिला.या माणसांना शिवसेना किंवा ठाकरे साहेब यांचेशी काहीच लागेबांधे नाही.छत्रपती शिवाजी महाराज आणि यांचा अनेक पिढ्यांचा संबंध नाही.हाताला शिवबंधन जरी बांधले तरीही ते तमा बाळगत नाहीत.कारण यापुर्वीही अशी अनेक बंधने त्यांनी तोडून फेकून दिली आहेत.ते धर्माचे बंधन पाळत नाहीत.ते न्याय ,निती चे बंधन पाळत नाहीत.ते कायद्याचे बंधन पाळत नाहीत.तर शिवसेनेचे बंधन का पाळतील?ते आहेत धंदेवाईक.शिवसेनेच्या तंबुत त्यांना त्यांचे दुकान चालवायचे होते.चालवले.हे माहिती असूनही त्यांना तंबूत जागा दिली.जरी त्यांनी जागेचे भाडे दिले असले तरीही.जर याच धंदेवाईक लोकांना भाजपच्या तंबूत जाऊन जास्त नफा मिळत असेल, संरक्षण मिळत असेल तर ते कशाला थांबतील येथे ?धंदा करणारा कोणतीही जात, धर्म,देशाचे बंधन पाळत नाहीत.ही तर एक संघटना आहे.यापेक्षा मोठी आणि मजबूत संघटना मिळाली तर ते सहज तिकडे जाऊ शकतात.हेतू हाच ,नफा कमावणे.सेवा नाही.मोदी,मल्या ,चोक्सी हे कोणत्याही देशाचे,धर्माचे नाहीत.सुरक्षित देशात निघून गेले.इतर जिल्ह्यांतील माहिती त्या त्या जिल्ह्यातील लोकांना असेल.मला जळगाव जिल्ह्यातील माहिती आहे.जळगांव जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार धंदेवाईक आहेत.सेवा वगैरे देखावा आहे.म्हणून जास्त नफा कमावण्यासाठी भाजपच्या तंबूत निघून गेलेत.त्यांनी शिवसेना सोडली असे नाही.ते गद्दार नाहीत.तो त्यांचा उद्देश आहे.चोराला गद्दार म्हणणे संयुक्तिक नाही.तो त्याचा धंदा आहे.आता त्यांनी दुकानाचे स्थलांतर केले आहे.फडणवीस कॉम्प्लेक्समधे.इतकेच. आजी माजी आमदारांनी घाऊक स्तरावर दुकानाचे स्थलांतर केले .असा प्रदिर्घ अनुभव असतांना ठाकरे साहेब पुन्हा असेच धंदेवाईक लोकांना शिवसेनेचे पदाधिकारी नियुक्त करीत असतील तर त्यांच्या हेतूवर शंका येणारच.ठाकरे साहेब जळगाव जिल्ह्यात आले तर कोणाकडे भेटीला गेले ?कोणाला उमेदवारी दिली? यावरून जनता अंदाज घेते,यांना नेमके काय हवे आहे?यांना कशाचे आकर्षण आहे? आमदार सोडून गेले म्हणून जास्त मनाला लावून घेऊ नये.शिवसेनेच्या आमदारांनी दुकानाचे स्थलांतर फडणवीस कॉम्प्लेक्समधे केले आहे.
.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
२१/२/२०२५
0 टिप्पण्या