प्राचीन काळापासून पवार राजवंशाची मुळे ही राजपूत वंशाबरोबर जोडली गेलेली आहेत. याची उत्पत्ती मध्य ३भारतातल्या मालवा क्षेत्रात झाल्याचा उल्लेख मिळतो. पवार या नावाला परमार या नावानेही ओळखले जाते. यांना चार प्राथमिक राजपूत कुळांपैकी एक असे चौराणिक अग्निवंशाचे वंशज मानले जाते. पवार या नावाबरोबरच परमार, पोवार, भोयर तसेच पंजाबी जाट, बंजारा आणि मराठी जातींमध्ये अग्निवंशाचे वंशज पहायला मिळतात. महाराष्ट्रात धार पवार क्षत्रिय समाज सेवा संस्था ही महाराष्ट्रातल्या पवार समाजाला आपली ती प्राचीन, अद्भूत ओळख करून देताना त्यांच्यासाठी सातत्याने कुलदेवतांच्या दर्शनाची अनोखी यात्रा घडवत असते. यावेळेस ८० पवार परिवारातले काही लोक या तीन दिवसांच्या यात्रेत सामील झाले होते. मध्यप्रदेशमधल्या उज्जैनमध्ये सर्वप्रथम या ८० पवार परिवाराने मुक्काम केला. त्यानंतर महाकाल ओमकारेश्वराचे दर्शन घेतले. मध्यप्रदेशातल्या खंडवामध्ये आणि नर्मदा नदीच्या मध्य द्वीपावर हे महाकाल ओंकारेश्वर मंदिर स्थापित केले गेले आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हे चौथ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. हे एक प्राकृतिक शिवलींग असल्याचे मानले जाते. पवार परिवाराने त्यानंतर सिद्धपीठ हरसिध्दी मंदिर इथे जाऊन माँ हरसिध्दीचे दर्शन घेतले. माँ हरसिध्दी ही सम्राट विक्रमादित्य यांची आराध्य देवी होती. मा देवीला प्राचीन काळात मंगळचंडी या नावानेही ओळखले जात होते. इंदोरमधल्या या पुरातन मंदिराला भेट दिल्यानंतर हरसिध्दी मंदिराजवळ असलेल्या ५१ फूट उंच असलेल्या दोन दीप स्तंभानाही भेट दिली. या स्तंभामध्ये द्वीप प्रज्वलीत केले जातात. ही अद्भूत रोषणाई पहाण्यासारखी असते. असं म्हणतात की ही परंपरासुध्दा राजा विक्रमादित्यने सुरू केली होती.
पवार परिवाराने प्रवासाच्या तिसर्या दिवशी गढ़कालीकाचे दर्शन घेतले. गढ़कालीका शक्तीपीठ मंदिर उज्जैन शहरात आहे. कवि कालीदास हे गढ़कालीकेचे उपासक होते. इथे कालीदास समारोह दरवर्षी होतो. या समारोहात गढ़कालीका देवीची आराधना केली जाते. या मंदिराची स्थापना महाभारत काळात झाल्याचे मानले जाते. या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्वार सम्राट हर्षवर्धन यांच्या हस्ते झाल्याचा उल्लेख आपल्या ग्रंथांमध्ये सापडतो. या मंदिरात नवरात्र व्यतिरिक्त इतरही काही उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. पवार नावाच्या परिवारातल्या तब्बल ८० जणांनी मध्यप्रदेशमधला आपला हा अद्भूत प्रवास तिसर्या दिवशी संपवून मुंबईकडे प्रयाण केले. धार पवार क्षत्रिय समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष संजय पवार यांनी या स्मरणीय अशा कुल-देवतांच्या दर्शन यात्रेसाठी अपार मेहनत घेतली. मुंबईतल्या इतर पवार परिवारातल्या लोकांना एकत्रित करून त्यांनी ही दर्शन यात्रेची अद्भूत वारी घडवली. प्रत्येक वेळी अशा यात्रेचे आयोजन अध्यक्ष संजय पवार मोठ्या तळमळीने करतात. यात त्यांना साथ देते, त्यांची पत्नी तेजल पवार (महिला प्रमुख) त्याचबरोबर सचिन पवार, नितिन पवार, राजेंद्र पवार, जगदीश पवार, अनिल पवार यांच्या मेहनतीचाही या दर्शन यात्रेत मोठा सहभाग असतो. महाराष्ट्रातली मराठी पवार परिवार यानिमित्ताने आपली खरी ओळख, आपले वंशज, आपली वंश परंपरा, त्याचे मूळ स्थान कुठे आहे हे सगळे ओळखू शकला आहे. यापुढेही ही पवार समाजाची दर्शन यात्रा अशीच अविरतपणे सुरूच राहणार आहे. गढ़कालीकेच्या दर्शनावेळी धारगावला गोंधळ घालण्याचा कार्यक्रमही यापुढे पवार समाजातर्पेâ नित्यनेमाने चालूच राहणार आहे. ८० जणांचा हा पवार परिवार अविस्मरणीय आठवणी आपल्या सोबत घेऊन अखेरीस मुंबईला परतली.
0 टिप्पण्या