Top Post Ad

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ता संमेलन

 राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ता संमेलन राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली माता रमाबाई आंबेडकर कॉलनी घाटकोपर मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राज्य स्तरीय कार्यकर्ता संमेलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली गंधकुटी संकल्प समिती हॉल माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर मुंबई येथे अतिशय जल्लोषात संपन्न झाले. विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र , मुंबई ,ठाणे ,आदी भागातील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे नेते पदाधिकारी या संमेलनास प्रामुख्याने उपस्थित होते. मुंबई मध्ये ज्या ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे त्या त्या ठिकाणी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका पक्ष स्वबळावर लढणार असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.


     महाराष्ट्रातून आलेल्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांचे स्वागत मुंबई प्रदेशच्या वतीने करण्यात आले.यावेळी *केंद्रीय सचिव श्रीकांतजी नायक, महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ साबळे, राज्य सचिव आर बी जगताप, मुंबई प्रदेश प्रभारी वसंतराव वाघमारे, युवा नेतृत्व बिपिन कटारे, मुंबई प्रदेश नेते अशोकराव भोगले, ठाणे महिला जिल्हाध्यक्ष रंजनाताई भांगे, दिवा शहर अध्यक्ष रमेश भाऊ तुपे, मुंबई रिक्षा युनियन मेहमूद भाई शेख, मुंबई नेते बाबासाहेब खरात, नाका कामगार अध्यक्ष मुंबई सागर भाई पिल्ले, मुंबई नेते शंकरराव तांबे, मुंबई नेते हनुमंत सस्कर, महिला आघाडी कविताताई लष्कर, मुंबई नेते संदीप गांगुर्डे, हितेश भालेराव, नाशिक नेते प्रशांत कटारे, मुंबई घाटकोपर सचिन भिसे* आदी पदाधिकारी नेते उपस्थित होते.यावेळी पक्षाचे दिवंगत नेते बाबुराव जी मेश्राम (नागपूर) यांना आदरांजली वाहण्यात आली 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com