मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या मागण्या महायुती सरकारने पूर्ण न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार....
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून संधी उपलब्ध करून दिली होती, विविध शासकीय विभागात हे सर्व युवक कार्यरत असून, आपले कर्तव्य आणि जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम प्रकारे पार पाडत आहेत, दरम्यान सर्व युवकांना शासकीय कामाचा अनुभव आणि मार्गदर्शन उत्तम प्रकारे मिळत असल्याचे युवकांचे म्हणणे आहे परंतु या प्रशिक्षणार्थचा कालावधी हा सहा महिन्याचा असल्याकारणाने फेब्रुवारी २०२५, मध्ये हा कालावधी पूर्ण होणार आहे, त्यानंतर हे सर्व युवक बेरोजगार होणार असल्याची भीती या युवकांमध्ये आहे. याबाबत शासनाला वारंवार कळवणे आंदोलने करणे शासन उदासीन भूमिका घेत असल्याने पुन्हा एकदा आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही. अशी भूमिका माजी खासदार हरिभाऊ राठोड, सामाजिक नेते बालाजी चाकूरकर पाटील यांनी घेतली. बेरोजगारांच्या रोजगारासंबंधात शासन वारंवार चालकल करत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा धड़क मोर्चा 3 मार्च रोजी मुंबई येथील आजाद मैदानावर धड़कणार असल्याची माहिती आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ज्या अस्थापानेत कार्यरत आहेत, तिथेच त्यांना नियमित करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, याचीच आठवण करून देण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे दोन वेळेस सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आंदोलन करण्यात आले, परंतु सरकारने या प्रशिक्षणार्थी च्या मागण्यासंदर्भात कुठलाही गांभीर्यपूर्वक निर्णय घेतला नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर असणाऱ्या या लाखो युवक- युवती मध्ये सरकार बद्दल नाराजीचा सूर आहे, तरी सरकारने या प्रशिक्षणार्थीच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून किमान त्यांचा कालावधी वाढवून, आहे त्या आस्थापणेत कायमस्वरूपी नोकरी मध्ये सामावून घेण्याबाबत विचार करावा असं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयीन स्तरावर प्रशिक्षणार्थीयांचा कालावधी वाढविन्या बाबत चर्चा आहे, परंतु जोपर्यंत जी.आर निघत नाही, तोपर्यंत युवक मानण्यास तयार नाही, येणाऱ्या दोन दिवसात शासनाने जी.आर काढावा, अन्यथा येणाऱ्या काळात महाराष्ट्रभर है युवक युवती संविधानिकरीत्या आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी खासदार लोकनेते हरिभाऊ राठोड तसेच सामाजिक नेते बालाजी चाकूरकर पाटील यांनी दिला.
1) संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा धड़क मोर्चा दिनांक 3 मार्च 2025 रोजी सकाळी दहा वाजता मुंबई येथील आजाद मैदानावर धड़केल....2) दिनांक 3 मार्च 2025 रोज सोमवार सकाळी 11 वाजता लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर 101 प्रशिक्षणार्थीसह आमरण उपोषणास प्रारंभ करतील...3) आझाद मैदानावरील उपोषणास पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील सर्व तहसील कचेरी समोर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी दररोज धरणे आंदोलन करतील....4) आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी 10 मार्च 2025 रोज सोमवारी उपोषणाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ आझाद मैदानावर 1 हजार पेक्षा जास्त प्रशिक्षण घेतलेले युवक मुंडन करून निषेध नोंदवतील...5) उपोषणाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच 12 मार्च 2025 रोज बुधवारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानात घेराव घालतील....6) उपोषणाच्या पंधराव्या दिवशी म्हणजेच 17 मार्च 2025 रोज सोमवार सकाळी अकरा वाजता आंदोलन करते प्रशिक्षण युक्त प्रशिक्षणार्थी मुंबई येथील मंत्रालयाला घेराव घालतील. अशाप्रकारे ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी प्रशिक्षणार्थ राज्य शासनाचे लक्ष व्यक्ती वेधतील..... अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थ्यांच्या मुदत वाढीसह समायोजना करिता आणि मानधनात वाढ करण्याकरिता आझाद मैदानावरील आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
0 टिप्पण्या