सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील पुणे विश्रांतवाडी येथील १००० विद्यार्थ्यांचे वसतिगृह २००७ साली पारित असून देखील PWD, पुणे महानगरपालिका, आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या कामचुकारपणामुळे तसेच जातीवादी मानसिकतेमुळे आजतागायत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू केले गेले नाही. याचा परिणाम म्हणून गावखेड्यातून पुण्यासारख्या महानगरात शिक्षणासाठी आलेल्या sc,st,obc विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. शिवाय विद्यार्थी हिताच्या विविध १६ मागण्या ज्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांवरील या शासनाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र १० फेब्रुवारी २०२५ पासून आयुक्तालय, चर्च पथ, पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहे. तरी पुण्यातील सामाजिक, राजकीय, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन सहकार्य करावे.
0 टिप्पण्या