श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा (एमएनडीटी महिला विद्यापीठ) ७४ वा वार्षिक दिक्षांत समारंभ अर्थात पदवी प्रदान कार्यक्रम १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह (पाटकर हॉल), एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या समारंभात विद्यापीठातील विविध विभाग, संचालनाधीन महाविद्यालये व संस्था तसेच संलग्न आणि स्वायत्त महाविद्यालयांमधून एकूण १५,३४६ विद्यार्थ्यांना पदवी/पदविका प्रदान केले जातील. यामध्ये १२,०४६ पदवीधर (Bachelor's Degree), २,४६० पदव्युत्तर (Master's Degree), १३० पढव्युत्तर डिप्लोमा (PG Diploma), ७०७ पदवीपूर्व डिप्लोमा (UG Diploma) आणि ३ प्रमाणपत्रे (Certificates) यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ.संजय नारकर यांनी दिली. पदवीदान कार्यक्रमाबाबत प्रसिद्धी माध्यमांना माहिती देण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देसाई मॅडम, शुभम सोनावणे, राजस लिमये, राजेंद्र वायंगणकर, मेहूल खोले आदी प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
या समारंभात विद्यापीठाच्या चार प्रमुख विद्याशाखांतील ११३ अभ्यासक्रमांमधील पदवी व पदविका प्रदान केले जातील. तसेच ४६ संशोधकांना (Ph.D. Scholars) डॉक्टरेट पदवी देण्यात येणार आहे. याशिवाय ७७सुवर्णपदके, ०१ रौप्यपदक, ०१ ट्रॉफी आणि १३५ विविध पारितोषिके प्रदान केली जातील. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन हे या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे या समारंभाचे प्रमुख अतिथी असतील. प्रो. (डॉ.) ज्योती पारिख, कार्यकारी संचालक, इंटिग्रेटेड रिसर्च अँड अॅक्शन फॉर डेव्हलपमेंट्स (IRADe) या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या असतील व दीक्षांत भाषण देतील. विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव या दीक्षांत अहवाल सादर करतील. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू प्रा. कबी ओझा, कुलमचिव प्रा. विलास डी. नांदवडेकर आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. संजय नेरकर यांनी सर्व मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्वांना या दीक्षांत समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.सन १९१६ मध्ये भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 'स्त्रीशिक्षणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण" या ध्येयाने स्थापन केलेले दक्षिण आशियातील पहिले महिला विद्यापीठ ज्याचे ब्रीदवाक्य "संस्कृता स्त्री पणशक्ती "हे आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठाचे चर्चगेट (मुंबई), जुहू (मुंबई), पुणे, श्रीवर्धन, पालघर आणि चंद्रपूर असे एकूण पाच आवार आहेत. विद्यापीठामध्ये ३१ विद्याशाखा, १३ संचालनाधीन महाविद्यालये, २ व्यवस्थापन संस्था, ११ केंद्रे, ३ कक्ष, ५ स्वायत्त महाविद्यालये आणि ३८० संलग्न महाविद्यालये आहेत, जी देशातील एकूण सात राज्यांमध्ये कार्यरत आहेत .एसएनडीटी महिला विद्यापीठात १,१०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून ८४,३३१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
0 टिप्पण्या