Top Post Ad

महापुरुषांच्या बदनामीचे षडयंत्र... यामागील सूत्रधार कोण ?

 महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी, धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक तेढ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीवर भारतीय न्याय सहिंता २०२३ कलम १९६, 353 (२) प्रमाणे गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच मागील काळापासून महापुरुषांच्या बदनामीची अनेक प्रकरणे घडत आहेत यामागील खरे सूत्रधार कोण हे शासनाने शोधून काढावे.    तसेच बीड जिल्ह्यातील सरपंच  संतोष देशमुख व  सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून ठोस आंदोलन करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाज, महाराष्ट्र. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले.  आंदोलनाबाबत अधिक माहिती देण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी  सुभाष सुर्वे, चंद्रकात भोसले. सूर्याजी सोनवले. पराग मुबरकर, गंगावणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रशांत कोरटकर (नागपूर-ब्राह्मण) या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिणकस व गलिच्छ वक्तव्ये करून बदनामी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने ही वक्तव्ये व धमकी देत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे. तरी शासनाने याबाबत कठोर पावले उचलत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली.

:१) ब्राह्मर्णाच्या शासनात तुम्ही काम करत आहे हे लक्षात ठेवा. २) बाजीप्रभू नसते तर तुमचा महाराज जीवंत नसता. ३) तुमचे महाराज पळून गेले. ४) जेम्स लेनचे पुस्तक वाचा, लोकांना सांगा जेम्स लेनने काय म्हटले आहे, व्ह इज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, हे लोकांना सांगा.५) ब्राह्मणांना कमी समजू नका, तुम्हाला ब्राह्मणांची ताकत दाखवतो, मग तुम्ही कितीही मराठे एकत्र करा.६) छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंढारकर हा ब्राह्मण होता, नाहीतर तुमचा छत्रपती कुठे. गेला असता माहीत पडलं नसतं.७) *** रेकॉर्ड कर तुझ्या बापाला, ब्राह्मणांना बोलशील ना तर तुझी *** मारून टाकेन***८) ज्यादिवशी ब्राह्मणाचा शब्द काढशील त्यादिवशी परशुरामाचा परशू तुझ्या*** घुसवील ***९) तुला तिथ येऊन मारीन. १०) तुला घरात येऊन मारीन***  अशा वक्तव्य ऑडिओ कॉलद्वारे प्रथांत कोरटकर या व्यक्तीने कैरी आहैत. तरीही सरकार या व्यक्तीला जाणीवपूर्वक पाठीशी घालत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला

सदर ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांच्या वॉलवर उपलब्ध आहे. राज्य सरकार, गृह विभाग व पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशांत कोरटकर (नागपूर) याच्यावर भारतीय न्याय सहिंता २०२३ कलम १९६, 353 (२) प्रमाणे गुन्हा दाखल करून वरील आरोपीला अटक करण्यात यावी तसेच त्याच्या ह्या कृती मागे कोणाचे संगणमत असेल तर त्यांना सुद्धा अटक करावी. अन्यथा यापुढे निर्णय आंदोलन करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com