साने गुरुजी नगर गोरेगाव पश्चिम ही वसाहत १९७५ पासून अस्तित्वात असून या वसाहतीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत, २०२१ कोव्हीड काळात पुनर्विकासाची प्रक्रिया येथील ५ सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पार पाडता सुरू केली, पाचही सहकारी संस्थांनी कायदेशीर नियम धाब्यावर बसवून प्रोगोव सोल्युशन या प्रकल्प व्यवस्थापकाची नियुक्ती केली, प्रोगोव सोल्युशन हे अनेक ठिकाणी शिल्प असोसिएशन या नावाने कार्यरत आहे व अनेक ठिकाणी शिल्प असोसिएशन ने घोटाळे केल्याचे उघड झाले आहे, वरळी आदर्श नगर नगर मधील आदर्श नगर श्रमिक को ऑप हौ सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शिल्प असोसिएट नेच विकासकाशी संगनमत करून रहिवाशांचे नुकसान करणारा प्रकल्प राबवण्याचा घाट घातला आणि तेथे सुद्धा शिल्प असोसिएट ने प्रोरेटा चुकीचा दाखवून योग्य व्यवहार्य अहवाल तयार केला नाही व रहिवाशांची दिशाभूल करून संमतीचे करारनामे मिळवण्यात आले, त्याचप्रमाणे साने गुरुजी नगर येथे प्रोगोव सोल्युशन यांनी दिलेल्या फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये अनेक घोटाळे केले असून त्यात प्रोरेटा शून्य दाखवून लोकांचा हक्क एक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला आहे,
तसेच १९ कोटी ८४ लाख इतकी सर्वोच्च फी आकारण्यात येणार असल्याचे रिपोर्ट मध्ये देण्यात आले आहे, साने गुरुजी नगर येथे आगळीवेगळी टेंडरिंग प्रक्रिया राबविण्यात आली , टेंडरिंग प्रक्रियेत स्वारस्य असलेला एकच विकासक होता व त्याच्या ऑफर ची तुलना स्वारस्य नसलेल्या विकासकाच्या ऑफर सोबत करण्यात आली, व बळजबरीने रोमेल विकासक लोकांवर थोपवण्यात आला, याच रोमेल विकासकावर नेस्को कोव्हीड घोटाळ्याची ईडी कारवाई सुरू असून त्या विकासकाचे बरेच प्रकल्प रखडलेले आहेत,मध्यंतरी रोमेल विकासक ९ महिने तुरुंगात होता ,सध्या जामिनावर बाहेर आहे,रोमेल विकासकाने दिलेली ऑफर सशर्त दिली असून त्यात मोतीलाल नगर व उन्नत नगर तसेच साने गुरुजी नगर एकत्रितपणे पुनर्विकास करण्याचे दिले आहे तसेच त्याचा प्रोरेटा साने गुरुजी नगर साठी वापरला जाईल असे ऑफर लेटरमध्ये लिहले आहे,
परंतु मोतीलाल नगर पुनर्विकास बाबतीत माननीय उच्च न्यायालयात गेल्या दहा वर्षांपासून केस सुरू असून मोतीलाल नगर व साने गुरुजी नगर एकत्रित पुनर्विकास करण्याचे कोणतेही आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले नाहीत असे असताना रोमेल विकासक साने गुरुजी नगर च्या लोकांची दिशाभूल का करीत आहे ? तसेच उन्नत नगर हे स्वयंपूनर्विकासासाठी जात आहे असे असताना त्याचा देखील उल्लेख रोमेल विकासकाने का केला आहे ? रोमेल विकासकाने कोणत्याही प्रकारची बँक गॅरंटी दिलेली नसून जर रोमेल विकासक बिल्डिंग बांधण्यास अयशस्वी झाला तर बिल्डिंग बांधण्याची जबाबदारी कोणाची? रोमेल विकासकावर गोरेगाव नेस्को कोव्हीड घोटाळ्याचे आरोप असून ईडी चौकशी सुरू आहे, अशा घोटाळेबाज विकासकाला प्रकल्प का देण्यात आला आहे ? म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल व मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, उपनिबंधक बी एस कटरे यांच्याकडे वारंवार घोटाळ्याची तक्रार केली असून त्यांनी जाणूनबुजून साफ दुर्लक्ष केले आहे, येथील रहिवासियानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील तक्रार केली असून त्यांच्या कार्यालयामार्फत म्हाडा ला कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत ,
*साने गुरुजी नगर येथील प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार प्रोगोव सोल्युशन च्या या सगळ्या घोटाळ्याविरोधात येथील रहिवासी गंगाराम भोईर, गणेश विचारे, विनीत गुप्ते, येसुदास चेट्टीयार, प्रमोद निब्दे यांनी आर्किटेक्ट कौन्सिल येथे याचिका दाखल केली होती आर्किटेक्ट काउन्सिल ने श्री निखिल दीक्षित यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली,तसेच आपण आर्किटेक्ट नसल्याचे प्रसारमध्यमा द्वारे जाहीर करण्यांचे आदेश दिले आहेत.त्या नोटीसीला उत्तर देताना निखिल दिक्षीत यांनी आर्किटेक्ट म्हणून काम करत असल्याबद्दल जाहीर माफी मागितली असून आपण पुन्हा कधीही आर्किटेक्ट पदवी लावणार नाही हे जाहीर केले आहे,गेल्या २२ वर्षांपासून निखिल दिक्षीत आर्किटेक्ट म्हणून मिरवत असून त्यांनी गेल्या २२ वर्षात केलेल्या प्रत्येक कामाची चौकशी करण्यात यावी ही मागणी विनीत गुप्ते व गणेश विचारे यांनी केली आहे, तसेच लवकरच ईडी,सीबीआय व इन्कम टॅक्स विभागाकडे देखील निखिल दिक्षीत व रोमेल विकासकाची तक्रार करणार असल्याचे राहिवासीयांनी सांगितले आहे,तसेच म्हाडा ने निखिल दिक्षीत यांना बेस्ट आर्किटेक्ट पुरस्कार कशाच्या आधारे दिला आहे असा सवाल राहिवासीयांनी केला आहे.*
आमचा पुनर्विकासाला अजिबात विरोध नाही , हे पाच जण चारशे जणांच्या न्याय हक्कासाठी लढत असून बाकीच्या रहिवासीयांनी आम्हाला साथ देऊन आपला हक्क आपल्या पदरात पाडून घ्यावा असे आवाहन केले आहे
0 टिप्पण्या