रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्यामार्फत 'द फिनिक्स मेगा मेडिकल कॅम्प' आयोजित करण्यात आला आहे. 11 आणि 12 जानेवारी रोजी फिनिक्स टॉवर्सच्या शेजारी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 4 दरम्यान दोन्ही दिवशी हे शिबिर सर्वांसाठी खुले असल्याची माहिती आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या शिबिराचे हे 16 वे वर्ष असून मागील प्रत्येक वर्षी 3,000 हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे. या वर्षी यापेक्षा अधिक संख्येने लोक यांचा लाभ घेतील असा आशावाद रोटरी प्रेसिडेंट अजय अग्रवाल यांनी व्यक्त केला. रोटरी डिस्ट्रिक्ट नियामक मंडळाकडून हा कार्यक्रम सर्वोत्कृष्ट सामुदायिक सेवा कार्यक्रमांपैकी एक म्हणून ओळखला गेला आहे. ज्याला स्थानिक नगरपालिका प्रभाग, नगरसेवक, आमदार आणि पोलिस स्टेशन आदींकडून मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळते. असेही अग्रवाल म्हणाले.
सर पी.डी. हिन्दुजा हॉस्पिटल, एचएन रिलायन्स हॉस्पिटल, कमलादेवी गौरीदत्त मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल, कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन, व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया आणि कैवल्य धाम इत्यादी प्रमुख वैद्यकीय संस्थांमधील डॉक्टरांची संपूर्ण टीम या शिबिरात आपले योगदान देते. नेत्र, दंत, दमा, ऑर्थोपेडिक, ईएनटी, कार्डिओलॉजी, साठी मोफत चेक-अप, कर्करोग, रक्त आणि मधुमेह चाचण्या.मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातील. मोफत आयुर्वेदिक तपासणी आणि सल्लामसलत केली जाईल आणि रुग्णांना औषधे दिली जातात तसेच अत्यंत सवलतीच्या दरात चष्मे दिले जातात. त्याचप्रमाणे योग प्रात्यक्षिक आणि सल्लामसलत करून मोफत ईसीजी सेवा या शिबिरादरम्यान देण्यात येतात.
0 टिप्पण्या