Top Post Ad

आनंद मरा नही.... आनंद मरते नही...

ठाण्याची शिवसेना अर्थात शिवसेनेचे ठाणे हा ठाण्यातील शिवसेनेचा  सत्तेचा राजमार्ग टेंभीनाक्यावरून जातो. जो आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून... धार्मिक अंग असलेल्या आनंद दिघेंनी आपल्याच  पक्षाची सत्ता असतानाही टक्केवारीचे प्रकरण चव्हाट्यावर आणले तरी ठाण्याची सत्ता हातची गेली नाही. इतकं त्याचं धार्मिक अधिष्ठान होतं.  `ठाण्याचे बाबासाहेब ठाकरे' अशी मानाची पदवी मिळणारे आनंद दिघे हे एक अनन्य साधारण व्यक्तिमत्व होते. कोणत्याही प्रश्नाचं संयमाने उत्तर देणे आणि आक्रमकपणे ते आमलात आणणे, विकास कार्यासोबत आपली धार्मिक वृत्ती जपणे हे त्यांचे वैशिष्ठय होते.  27 जानेवारी 1951 रोजी टेंभी नाका, ठाणे येथे जन्मलेले आनंद चिंतामणी दिघे 1966 साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा  किशोरवयीन होते. शिवसेनेला पहिली सत्तेची चव ठाण्यानेच दिली. ज्यामध्ये आनंद दिघे यांचा सिंहाचा वाटा होता.  बाळासाहेब ठाकरे यांची ठाण्यातली पहिलीच सभा ऐकून शिवसेनेची धुरा आनंद दिघे यांनी खांद्यावर घेतली. इतकच काय तर यासाठी त्यांनी आई-भाऊ-बहीण असा परिवार असलेलं घर सोडलं.  शिवसेना संपर्क कार्यालय हेच आपलं घर असं म्हणत त्यांनी अविवाहीत राहून आपला संपूर्ण वेळ शिवसेनेसाठी समर्पित केला.   टेंभीनाका परिसरातील `आनंदाश्रम' मधून ते सर्वांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे आणि त्यावर तात्काळ निर्णय द्यायचे  काम पूर्ण करुन घेण्यासाठी कधी कधी  रोख'ठोक' भूमिका तर काही प्रसंगी हात उचलल्याचेही उदाहरणे आहेत. ठाण्यातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिघेंनी अनेक प्रयत्न केले अनेकांना स्टॉल उभारुन दिले. तर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये स्थानिकांना नोक्रया मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या याच कामांमुळे त्यांच्या मृत्यूला दीड तप उलटून गेले तरी ठाणेकर त्यांना विसरलेले नाही.  


   आनंद दिघेंचे ठाण्यातील कार्य इतके मोठे होते की स्थानिक प्रसारमाध्यमांबरोबर इंग्रजी प्रसारमाध्यमांनीही वेळेवेळी त्यांची दखल घेतली.  परिणामी  प्रशासनापासून सामान्यांपर्यंत एक आदरयुक्त दरारा त्यांच्याबाबत निर्माण झाला होता. इतकेच काय तर त्यांचा `आनंद आश्रम' हे समांतर न्यायालयाच्या भूमिकेत काम करत असल्याची टीका देखील काही मंडळींनी केली होती. त्यांची कामाची आक्रमक पद्धती आणि स्वतच्या बळावर निर्णय घेण्याची क्षमता या सर्वाचा परिणाम त्यावेळी असा झाला होता की,  ही व्यक्ती शिवसेनेत नवीन गट निर्माण करते की काय अशी  शंका निर्माण झाली होती. त्यांच्या लोकप्रियतेचा वाढता आलेख स्वकियांनाच डोईजड होत असल्याची चर्चा नेहमीच त्यावेळी होत असे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आनंद दिघे यांनी कधीच कोणतीही निवडणूक लढवली नाही. पण, त्यांच्या संपर्कात आलेले कित्येक कार्यकर्ते त्यांनी घडवले आणि त्यांना राजकीय पद मिळवून दिले. संपूर्ण ठाणे जिह्यामध्ये 90 च्या दशकात मुख्य शहरांपासून ते थेट वाडा मोखाड्याच्या पाड्यापर्यंत शिवसेना पोहोचवली.   

अशा या लोकप्रिय नेत्याच्या 24 ऑगस्ट 2001 रोजी एका कार्यक्रमाला जात असतांना गाडीला अपघात झाला आणि त्यांच्या पायाला, डोक्याला मार लागला. उपचार घेण्यासाठी त्यांना ठाण्यातील सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीविताला असलेला धोका टाळण्यात डॉक्टरांना यश आलं होतं. पण, 26 ऑगस्ट 2001 रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावली. शिवसेनेचे वरिष्ठ नेते मनोहर जोशी त्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा कित्येक दिवसांपासून हृदयाचा त्रास होत असल्याची चर्चा डॉक्टरांसोबत झाली. ज्यावर त्यांनी कधीच त्यावर उपचार घेतले नाहीत. संध्याकाळी 7.15 वाजता त्यांना ह्रदयविकाराचा पहिला झटका तर लगेच7 वाजून 25 मिनिटांनी दुसरा तीव्र झटका आला आणि त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. रात्री साडे दहा वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची हॉस्पिटल प्रशासनाने अधिकृत घोषणा केली.  आनंद दिघे आपल्याला सोडून गेले हे ऐकताच शिवसैनिकांचे दुःख, राग अनावर झाला. ठाण्यातील शिवसैनिकांनी ठाण्यात एक नेता घडतांना बघितला होता. जो अल्पावधीतच काळाच्या पडद्या आड गेला. आनंद दिघे हे राजकारणात काम करू इच्छिण्राया प्रत्येक शिवसैनिकासाठी एक आदर्श होते आणि आहेत. असा नेता आणि संवेदनशील व्यक्ती पुन्हा होणे नाही हेच खरं. मात्र असं असलं तरी आजही अनेकांच्या मनात त्यांच्या मृत्युचं कोडं काही सुटलेलं नाही. त्यांना कमी वयात म्हणजे वयाच्या पन्नासाव्या वर्षी या जगाचा निरोप का घ्यावा लागला असेल ? त्यांची वाढती लोकप्रियता बघून 2001 मध्ये त्यांचा प्रवास थांबण्यात आला का? हे प्रश्न आजही लोकांच्या मनात आहेत. 

----------------------------------------------------

कित्येक वर्षांपूर्वी अनेकांना  जीवनाचा आनंद दिसला गवसला बऱ्याच जणांच्या हातातील शस्त्र गळली माझ्या सारखे अनेक हळूहळू नव्हे तर तात्काळ भक्त झाले, भक्ता प्रमाणे भक्ती केली, पूजा केली, रोज स्मरण केलं, आजही करताहेत ते जावून दीड तप उलटूनही,  माझा देव सुध्दा दाढीवाला होता  तो १६ तास नव्हे २० तास लोकसेवेत व्यग्र असायचा त्याने लग्न नव्हतं केलं त्याने समाजाशी संसार मांडला होता तो बंगल्यात नव्हे साध्या जुन्या घरात रहायचा तो कपडे अतिशय साधे वापरायचा त्याला अंगरक्षक खूप होते, परंतु तो सोबत कुणालाच घ्यायचा नाही त्याचं जेवणा कडे लक्ष नसायचं त्याचं झोपण्या कडे दुर्लक्ष असायचे तोअनेकांच्या हिटलिस्ट वर होता परंतु दोन कुत्र्यां सोबत तो एकटाच झोपायचा त्याच्या दाराला कडी नसायची तो खूप कमी बोलायचा तरीही त्याच्या सोबत भरपूर आंतरिक संवाद व्हायचा तो उग्र ही होता अन्याय शोषण याविरुद्ध तो बोलायचा नाही, थेट क्रुती करायचा तो भाषण देत नव्हता दुष्ट त्याला वचकून असायचे तो प्रचंड धाडसी होता लोकांच्या देव्हाऱ्यात देवापेक्षा त्याचा फोटो मोठा असायचा. त्याच्या पायाला स्पर्श करण्या साठी रांग लागायची आठवड्यातून एकदाच रात्री तो आईला भेटायला जायचा सोबत त्याच्याकडे साधी जीप असायची.
 मोठमोठे सिध्द साधक त्याला लवून अभिवादन करायचे तो थोरामोठ्यां समोर नतमस्तक व्हायचा. आमदार खासदार मंत्री संत्री त्याच्या पायावर पडायचे तो परदु:ख ओळखायचा ते दूर करण्याचा प्रयत्न नव्हे प्रत्यक्षात दूर करायचा. त्याला असाध्य काहीच नाही अशी भावना त्याच्या डोळ्यात पहाताच निर्माण व्हायची. तो निवडणूक लढवत नव्हता, परंतु त्याचं नाव लावताच कुणीही पराभूत होत नव्हतं. तो स्वत:ला विसरलेला होता. म्हणूनच आजही तो प्रत्येकाला आठवतो त्याचा शब्द कुणी मोडला नाही त्याच्या उपयोगी पडण्याची संधी प्रत्येकजण शोधायचा त्याच्यावर लोकांचा विश्वास होता श्रद्धा होती त्याच्या विषयी संशय कधीच निर्माण झाला नाही इतरांना त्याने सर्व भौतिक सुखे दिली, परंतु तो स्वत: त्यात रमला नाही. त्याचा स्वत:चा असा एक कायदा होता लोकां साठी तो फायद्याचा होता अनेकदा कायदाही त्याच्या समोर कमरेवर हात ठेवून मौन उभा राहिला, तो लोकशाहीतला राजा नव्हता,परंतु लोकांच्या दिलावरचा अनभिषिक्त सम्राट होता तहानभूक झोप नसतानाही त्याची मुद्रा तेजस्वी दिसायची त्याचाही एक पक्ष होता परंतु त्याचं लक्ष लोकसेवा व लक्ष्य त्याही पलिकडे पारलौकिक होतं. तो दिसला की निराशा पळून जायची तो हसला की मन आनंदानं भरुन जायचं तो फक्त तोच होता ज्याचा भक्त म्हणून मिरवणं हा आमच्या साठी सन्मान होता आजही आहे आम्ही त्या उत्तम देवाचे भक्त आहोत, हा माझ्या सहित हजारो कार्यकर्त्यांना अभिमान आहे.---- 

अशोक कुलकर्णी (वर्तकनगर ठाणे )


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com