मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात पत्रकार संघाने आय़ोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेतील विजेते छायाचित्रकार, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंदाज-२०२४ चे विजेते तसेच मुंबई पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारे विविध पुरस्कार महनीय प्रवक्ते आणि ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पुरस्कार विजेत्या छायाचित्रांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे खजिनदार जगदिश भुवड, विश्वस्त वैजयंती आपटे, राही भिडे, देवदास मटाले, कार्यकारिणी सदस्य आत्माराम नाटेकर, अंशुमन पोयरेकर, देवेंद्र भोगले, किरीट गोरे तसेच अंतर्गत हिशेब तपासनीस हेमंत सामंत आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार संघाने आय़ोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेतील विजेते मंगेश मोरे (दै. सामना), घन:श्याम भडेकर (ज्येष्ठ पत्रकार), सचिन लुंगसे (दै. लोकमत), विनोद राऊत (दै. सकाळ), पांडुरंग म्हस्के (दै. सकाळ) पुरस्कार विजेत्या छायाचित्रकारांचा तसेच ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंदाज-२०२४ चे निकाल विजेते नंदू धुरंधर, संजीव उपरे तसेच गुरुदत्त लाड, छायाचित्र स्पर्धेचे संयोजक अंशुमन पोयरेकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.. पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंगेश मोरे (आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार), घनश्याम भडेकर (जयहिंद प्रकाशन पुरस्कार), सचिन लुंगसे (कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार), विनोद राऊत (विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार) आणि पांडुरंग म्हस्के (नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कार) यांना महनीय प्रवक्ते आणि ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच पुरस्कार विजेत्या छायाचित्रांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.हिटलरशाहीच्या कालखंडाचा पत्रकारांनी अभ्यास करायला हवा, अन्यथा ही आग आपल्यापर्यंत कधी येईल सांगता येत नाही. दमन, दडपशाहीविरोधात पत्रकारांनी उभे राहायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ संपादक आणि साहित्यिक महावीर जोंधळे यांनी यावेळी केले. देशभरातील परिस्थितीमुळे आज सर्वसामान्य माणूस भयाकूल आहे. भय कोणत्या मार्गाने आपल्यापर्यंत येईल हे सांगता येत नाही. त्यावर मात करण्यासाठी मानवता वाढवणे, जपणे गरजेचे आहे; अन्यथा आपला इस्त्राईल होईल, अशी भीतीही जोंधळे यांनी यावेळी व्यक्त केली.
0 टिप्पण्या