Top Post Ad

रायगडमधील अवैध धंद्याविरोधात अॅड काशिनाथ ठाकूर यांचे मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण आंदोलन

 संपूर्ण रायगड जिल्ह्यात  लेडीज डान्स बार. मटका, जुगार, क्लब, चक्री ऑनलाईन मटका, चिमणी पाखरं, पताडा, अंदर बाहर, तीन पत्ती जुगार  तसेच अनधिकृत भंगाराचे शेकडो बेकायदेशिर व्यवसाय राजरोसपणे सुरु असून याबाबत कित्येकवेळा तक्रारी देऊनही पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काशिनाथ ठाकूर यांनी केला आहे.. या अवैध धंद्यांमुळे कायदा सुव्यवस्था टिकून राहिल का ? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात असून हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होणे गरजेचे आहे. या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरुण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तसेच शेकडो भंगाराचे बेकायदेशिर व्यवसाय सुरू आहेत. परिणामी मानवी हक्काचे उल्लंघन होत आहे. पोलिस प्रशासनाकडे तक्रारी करूनही यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने या विरोधात अॅड काशिनाथ ठाकूर यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे २७ जानेवारीपासून उपोषण आंदोलन सुरु केले आहे. 

 भोळी भाबडी माणसं  उद्या मटका, जुगार, क्लब, चक्री ऑनलाईन मटका, चिमणी पाखरं, पताडा, अंदर बाहर, तीन पत्ती जुगारातून पैसा मिळेल अशी अपेक्षा ठेवत असतात. दिवसभरात घाम गाळून कमविलेला मेहनताना अवैध धंद्यात जुगार खेळून बक्कल पैसे कमाई आज करेल ! जुगारात जिंकलेला आपआपल्या घरात जाऊन बायको, मुलगा पैसा मुलीं. आई वडीलांच्या हातात देवून त्यांच्या गरजा पूर्ण करेल असे स्वप्न उराशी बाळगून असतात. पण त्या मोलमजुरी करणाऱ्यांची फसगत होवून त्यांच्या पदरात निराशा येते. जुगारात दिवसभराची कमाई हरल्यामुळे ते दुःख विसरण्यासाठी मग त्यांची पाऊले न कळत दारूच्या दुकानात वळतात. दारू पिऊन घरी आल्यावर कुटुंब त्याच्या पगाराची आतुरतेने वाट पाहत पैसा घरच्याकर्त्याने जुगारात हरल्याने त्याचे पूर्ण असतात. पण उपासमारीची येते. असे अनेक कुटुंब देशोधडीला लागले असून यास जबाबदार पोलीस प्रशासन, राजकीय पक्षांचे नेत्यांचे पाठबळ, गुंड प्रवृत्तीचे धंदेचालक आहेत. अशा परप्रांतिय लोकांमुळे जिल्ह्यातील अवैध जुगार आणि बेकायदेशीर धंदे फोफावत आहेत. यावर तात्काळ आळा घालण्यासाठी.मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले असून यावर तातडीने  कारवाई करून बेकायदेशीर धंदे बंद करावेत. आपला आवाज शासन दरबारी पोहोचावा याकरिता आपण उपोषण आंदोलन करीत असल्याचे ठाकूर म्हणाले, 

  • बेकायदेशीर धंद्याची यादी खालीलप्रमाणे
  • 1) खालापूर -5 लेडीज डान्स बार
  • 2) कर्जत 1 क्लब, 2 मटके
  • 3) नेरळ 1 क्लब, 3 मटके
  • 4) माथेरान 2 क्लब, 2 मटके
  • 5) खोपोली 2 मटके
  • 6) खालापूर 1 मटका, 2 ऑइल
  • 7) रसायनी 1 क्लब, 1 मटका, 1ऑइल 
  • 8) पेण 1 क्लब, 2 मटके
  • 9) पोयनाड 2 मटके
  • 10) अलिबाग - 5 मटके, 1 क्लब
  • 11) मांडवा 1 क्लब, 3 मटके
  • 12) रेवदंडा 3 मटके
  • 13) मुरुड -3 मटके
  • 14) दिघी 2 क्लब, 2 मटके
  • 15) श्रीवर्धन 1 क्लब, 2 मटके
  • 16) म्हसळा 1 क्लब, 2 मटके
  • 17) रोहा - 2 मटके
  • 18) कोलाड 1 क्लब, 2 मटके
  • 19) नागोठणे - 2 मटके
  • 20) पाली 1 बलब, 3 मटके
  • 21) माणगाव 1 क्लब, 3 मटके
  • 22) महाड शहर 3 क्लब, 3 मटके
  • 23) महाड midc- 1 क्लब, 2 मटके
  • 24) गोरेगाव - 1 क्लब, 2 मटके
  • 25) पोलादपूर - 2 क्लब, 2 मटके
  • खालीलप्रमाणे भंगार व्यवसाय हे रोजचे करोडाचे व्यवसाय आहेत ते खालीलप्रमाणे:-
  • 26) पेण येथे झबू JSW स्टील,
  • 27) दादरा येथे आश्रफ JSW स्टील,
  • 28) कोलाड येथे रियाज,
  • 29) नावेद व रईस Posco स्टील,
  • 30) एमआयडीसी महाड येथे शकील, मुरा, रशीद,
  • 31) माणगांव विळे भागड येथे राजू पोस्को,
  • 32) वडखळ येथे JSW भंगार राजू, चौधरी, बिरबल, मिश्रा, शफिक,
  • 33) रोहा येथील मेनू हे सर्वात मोठे भंगार व्यावसायिक बेकायदेशीर रित्या व्यवसाय करतात
  • तसेच छोटे भंगार व्यवसायीक हे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दींत ४/५ तरी आहेत, अशी माहिती काशिनाथ ठाकूर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com