Top Post Ad

१२० कोटी थकीत असल्याने कंत्राटदारांकडून औषध पुरवठा बंद, पालिका रुग्णालयांत रुग्णांची गैरसोय

 

मागील चार वर्षापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेने थकीत १२० कोटी रुपयाची देणी अद्याप दिली नसल्याने १३ जानेवारी २०२५ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २७ रुग्णालयांना ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स फाउंडेशनने औषध पुरवठा थांबवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सोमवारी दिली. पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाकडून निविदा प्रक्रिया किंवा दर करारांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे रुग्णालयांना केवळ स्थानिक खरेदी आणि जुन्या दर करारावर आधारित पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सार्वजनिक पैशांचा कोट्यवधींचा अपव्यय होत आहे असे पांडे यांनी यावेळी  सांगितले.  सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त  विपिन शर्मा यांना हा विषय सोडवण्याचे निर्देश पालिका आयुक्त यांनी दिलेले आहेत. आम्ही लवकरात लवकर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त करतो. मात्र आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्हाला औषध पुरवठा थांबवण्याचा निर्णय कायम ठेवावा लागेल असेही पांडे यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com