: ठाणे महानगरपालिकेचे दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्यावर अतिक्रमण कारवाई दरम्यान हल्ला करण्यात आला. प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
कल्याण फाटा ता. जिल्हा ठाणे येथे दि. २ जाने रोजी दुपारी ०२:०० से ०२:१५ वा.च्या सुमारास अटलांटा बिल्डींगचेच्या शेजारी सहायक आयुक्त भालचंद्र घुगे आपल्या अतिक्रमण विभागाचा स्टाफ, डायघर पोलिस स्टेशनचे पोलिस, तसेच एम.एस. एफचे अमलदार असे मिळून कारवाई करत असताना अब्दुल शाह आलम खान, वय-२७ वर्षे, व शाहआलम खान, वय-६३ वर्षे, यांनी मारहाण केली व शिवीगाळ करून धमकी देवुन सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी दोन्ही इसमांविरोधात डायघर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या