Top Post Ad

अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणीही ढोल-ताशे व बॅण्ड वाजवा- संजय वाघुले

मालमत्ता थकबाकीदार बिगरनिवासी आस्थापनांच्या मालमत्तां करदात्यांच्या दरवाजात ढोल-ताशांसह बॅण्ड वाजविण्याचा स्तुत्य निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. एकीकडे मालमत्ता कराच्या थकबाकीमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले असताना, ठाणे शहरात सुरू असलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. याकरिता महापालिकेचा दहा लाखांहून अधिक मालमत्ता कर थकविणाऱ्या आस्थापनांच्या दरवाजाबरोबरच ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणीही ढोल-ताशे व बॅण्ड वाजवावेत, अशी मागणी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना अनधिकृत बांधकामांची माहिती होण्याबरोबर माफियांनाही काहीसा आळा बसू शकेल, असे वाघुले यांनी पत्रात म्हटले आहे.  

एक सात मजली अधिकृत इमारत बांधल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीत सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. मात्र, सद्यस्थितीत दुर्देवाने शेकडो अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात आहे. अनधिकृत बांधकामांना बेकायदा नळजोडणी दिली जात असून, महापालिकेच्या अधिकृत वाहिन्यांना सांडपाणी व मलवाहिन्या जोडल्या जात आहेत. या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, चारचाकी वाहने रस्त्यालगत उभी करून वाहतूककोंडीत भर पडत आहे. ठाणे शहराच्या बकालपणात वाढ होत आहे. अशा भीषण परिस्थितीत अनधिकृत बांधकामे करणाऱ्या माफियांना जरब बसविण्याची आवश्यकता आहे, महापालिकेच्या बारा प्रभाग समितीतील अतिक्रमण व निष्कासन उपायुक्तपदाबरोबरच परिमंडळ २ चा कार्यभार  शंकर पाटोळे यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी ढोल ताशांसह बॅण्ड वाजविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी वाघुले यांनी केली आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com