पुणे - साळी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲर्गिकल्चंर या सामाजिक समिती द्वारे ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ दिनी साळी समाजातील उद्योजक क्षेत्रातील उद्योजक व्यवसाय करणार्या मुला-मुलीचे गुगल मिट व्दारे तिसऱ्या पुष्पाचे ऑन लाईन पध्दतीने वधुवर चर्चा परिचय मेळाव्याचे आयोजन समितीचे आयोजक नितीनबोस व नितीन मोडक यांनी केले. या गुगल मिट व्दारे वधूवर परिचय तिसऱ्या मेळाव्याचे उद्घाटन मंचरचे सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ मोहन एस साळी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या पद्धतीने घेतलेल्या वधुवर परिचय मेळाव्याचे त्यांनी कौतुक केले तर उपस्थित वधुवरानी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन तसेच जास्त अपेक्षा न बाळगता आपल्या जिवन साथीचे निवड करुन या मेळाव्याचा माध्यमातून वैवाहिक जीवनाचा लाभ घ्यावा व समाजाच्या समाज कार्यासाठी साठी पुढे यावे असे आवाहन केले.
तर नितीनबोस वैद्य, नितीन मोडक, वंदना सवायीराम, .पुष्पालता साळी, प्रियंका चिल्लाळ यांनी वधूवराशी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चेच्या माध्यमातून परिचय करून घेतल्याने वधुवर ही अतिशय उत्साहाने, आनंदाने आपला परिचय देत होते. या सर्व गुगल मिट ऑनलाईन कार्यक्रमांचे नियोजन, परिश्रम यशवर्धन मोडक यांनी सुत्र सांभाळले होते. या वधुवर मेळाव्यात विविध शहरांतील १२५ उद्योजक वधूवरानी ऑनलाईन व्दारे सहभाग घेतला व आपला परिचय दिला. तर सहभागी वधूवर व पालकांनी ही कौतुक केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे प्रायोजक मुंबई येथील प्रतिभा चिल्लाळ, नाशिकहून हेमंत उत्तमराव निकुंभ, जळगावहून पुष्पालता साळी, औरंगाबादहून वंदना सवायीराम यांनी वधूवराची नोंदणी केली व कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तर सामाजिक कार्यकर्ते हेमंत उत्तमराव निकुंभ यांच्या उल्लेख निय कार्याबद्दल व समितीत सहभागी झाले बद्दल त्यांचे सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. या वेळी त्यांना मिळालेल्या २२१ व्या सन्मानाबद्दल भावूक होवून आयोजकांचे व उपस्थिताचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षरांनी ना भुतो न भविष्यती असा अविस्मरणीय आठवणीचा ठेवा आहे कारण ७६ व्या 'प्रजासत्ताक दिनाच्या' शुभ दिनी ऑनलाईन वधुवर परिचय मेळाव्याचे तिसर्या पुष्पाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. हा उपक्रम म्हणजे समाजाने ही आदर्श घ्यावा असे सांगितले. तर विशेष करून यशवर्धन मोडक यांचे विशेष कौतुक केले त्यांनी इन्टनेटच्या माध्यमातून अतिशय सुरेख आखणी करुन सर्व वधुवरांची नोंदणी केली. पुण्याचे प्रायोजक .जानकीताई वैद्य, संध्याताई मोडक यांनी कार्यक्रमाचे आयोजन अति परिश्रमातून अतिशय शिस्त बंध पध्दतीने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली.
0 टिप्पण्या