संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून २५ जानेवारी रोजी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान सर्व पक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार जितेंद्र आव्हाड, राजेंद्र कोंढरे (मराठा क्रांती मोर्चा), ज्योती मेटे (शिवसंग्राम संघटना अध्यक्षा), योगेश केदार, धनंजय देशमुख (संतोष देशमुख यांचे भाऊ), दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख, आरपीआयचे कुलाबा तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड, सागर संसारे, महेश तपासे, महेंद्र गावडे, ऍड. बालुशा माने, चंद्रकांत भोसले आणि ऍड. सुभाष सुर्वे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी वैभवी देशमुख म्हणाल्या माझ्या वडिलांना ज्यांनी मारले त्यांना अटक करून कठोर शिक्षा व्हायलाच हवी. तर मिलिंद सुर्वे म्हणाले की, संतोष देशमुख आणि सुर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही हा आक्रोश करीत आहोत. देशमुख यांची हत्या होऊन २ महिने झाले आहेत त्यांच्या आरोपींना अटक करून त्यांना मोका लावण्याचा बनाव या सरकारने केला आहे. परंतु सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याचे प्रयत्न सरकारने केलेले नाही. त्यामुळे आम्ही परभणी ते मुंबई असा मोर्चा काढला आहे सरकार कडून न्यायाची कोणतीही अपेक्षा नाही. आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. १/२ तारखेला निळे वादळ मुंबई मध्ये येणार आहे तर त्या वादळात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुर्वे यांनी केले. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष सुर्वे यांनी मोर्चा मधून आमच्या काही मागण्या आहेत ज्या शासनापर्यंत गेल्या पाहिजे असे सांगितले.
संतोष देशमुख कुटुंबीय आणि सोमनाथ सुर्यवंशी कुटुंब बांना न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा आहे. वाल्मिकी कराड आणि त्यांना मदत करणारे देखील आरोपी आहेत. मदत करणारे त्यांची संपत्ती सांभाळणारे, त्यांना गाड्या पुरवणारे जे कोणी आहेत ते सुद्धा मोका अंतर्गत गुन्हेगार ठरतात, तर त्यांची नावं सुद्धा उघड करून त्यांना ताबडतोब अटक करावी अशी आमची प्रथम मागणी आहे. वाल्मिक कराड़ आणि सर्व कथित आरोपी यांची सर्व स्थावर मालमत्ता, बँक खाते मकोका कायदा कलम २० प्रमाणे ही जमा करावी. ती जमा करून त्याचे मूल्यांकन करण्यात यावे. त्याचं व्हॅल्युएशन करून त्याचा रिपोर्ट इडीला पाठवावा. त्याच्यानंतर इन्कम टैक्सला पाठवावा. त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस मध्ये त्याचा अंतर्भाव जोडण्यासाठी या रिपोर्टची फार आवश्यकता असते. त्याच्यावरच त्यांची संपत्ती जमा होत असते.
वाल्मिकी कराड आणि त्याचे साथीदार, मार्गदर्शक सहकारी यांच्या सीडीआर काढून संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी करावी. त्यांचे काही कॉल हे विदेशात झालेले आहेत असे सुद्धा समजते. त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्या दिवशी जे घडलं ते पोलीस स्टेशनमध्ये ६३७ नंबरचा गुन्हा नोंद झाला. दुपारी तीन वाजता ही घटना घडली देशमुख कुटुंब येथे आहे त्यांच्यातला एक ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट लिहिण्यासाठी गेला त्यांनी माहिती सांगितली. त्यात तीन कार आल्या होत्या परंतु पोलिसांनी इंटरेस्ट दाखऊन त्या गाड्या पकडल्या नाहीत. कारचे नंबर त्याच्यामध्ये असलेल्या लोकांना आयडेंटिफाय करून त्यांनी नाव दिली होती. पोलीस स्टेशनच्या अंमलदाराने एवढेच केलं पाहिजे होतं की नंबर प्लेट सार्वत्रिक करुन बाजूच्या दोन-तीन पोलीस स्टेशनला पाठवल्या असत्या, परंतु ते न करता या देशमुख कुटुंबीयांना आणि त्या तक्रारदारांना तिथे संध्याकाळी सात वाजेपर्यंत बसवून ठेवलं. त्यानंतर केवळ अपहरणाचा गुन्हा नोंद केला. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने तत्परता दाखवली असती तर संतोष देशमुख वाचला असता. त्याचा खून झाला नसता. असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले
फरार आरोपी कृष्णा आंधळे यांस त्वरित मोका खाली अटक करावी. वाल्मिकी कराडवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. त्यास मोका लावला आहे. मात्र खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली तर त्याचा परिणाम वेगळा झाला असतो. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्याखाली कारवाई व्हावी. ६३७ आणि ६३८ या दोन पोलीस स्टेशनच्या गुन्यांमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचा हस्तक्षेप किया दबाव तपास करणाऱ्या अधिकाऱ्यावर असू नये.अश्या कोणत्याही अधिकाऱ्याची संविधानिक पदावर नियुक्त करू नये ही आमची एक प्रमुख मागणी आहे. आमच्या या मागण्या सविस्तर लिहून त्याची पिटीशन तयार करून आम्ही स्थानिक पोलिस स्टेशनला पाठवणार आहोत. आमची इच्छा आहे की पोलीस स्टेशन आणि सीआयडी यांचा तपास हायकोर्ट मॉनिटर करू शकते. आमच्या या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात असे मत सर्वच मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, आंदोलनात फोटो काढले म्हणून सोमनाथ सुर्यवंशी याला ताब्यात घेऊन मारण्यात आले. सोमनाथ सुर्यवंशी जेलमध्ये दवाखान्यात नेण्यासाठी तडफडत होता अरे हरामखोरानो तुम्ही त्याला दवाखान्यात नेले नाहीत पण कराडला मात्र तुम्ही दवाखान्यामध्ये ठेवले आहे. देशमुखला देखील कोयता आणि रॉड ने मारले त्याच्या आरोपीला तुम्ही सहिसलात ठेवले आहेत. मुख्यमंत्री म्हणे दाओसला उद्योग आणायला गेलेत. अरे कसले उद्योगधंदे आणता इथे माणसे मारली जात आहेत त्याकडे लक्ष द्या. धनंजय मुंडे गोचीड सारखा खुर्चीला चिकटून बसला आहे. लाज वाटते का रे तुला. महादेव मुंडे यांचा आरोपी माहिती नाहीत, गोपीनाथ मुंडे, विनायकराव मेटे यांच्या आरोपींना का शोधून काढत नाही. आज वेळ आली आहे या कुटुंबीयांना न्याय देण्याची. आपण सर्व लोक एकत्र जमले पाहिजे. देशमुख हा बौद्ध समाजातील लोकांना मारत असताना त्यांना वाचवण्यासाठी गेला होता. त्यामुळे देशमुख आपल्यासाठी मेला आहे. कराड याला जर ६ महिने हॉस्पिटल मध्ये ठेवलं तर लक्षात ठेवा. मला आता संशय येते की यांची टेस्टिंग चालू आहे की वेगवेगळ्या समाजातील लोकांना मारून आपण किती जागरूक आहोत हे पाहण्याची. देवेंद्र फडणवीस, अजित दादा, तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. दाओसला फिरणे बंद करा इथे महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या तात्काळ भूमिका न घेतल्यास इशारा न देता आक्रमक भूमिका घेतली जाईल,
आंदोलनातील लोकांच्या सहभागी झालेल्या संख्येवरती जाऊ नका, लढाई ही गर्दी लढत नसते तर दर्दी लढत असतो. पहिल्या दिवशी विधानसभेला या विषयाला हात आम्ही घातला होता ते अद्यापपर्यंत आम्ही लढा लढत आहोत. वाल्मीक कराड याला अटक केली म्हणतात पण तो मस्त आय.सी.यू.मध्ये झोपला आहे. चांगला आहे. आता कराडला मोठ मोठे आजार होतील आणि त्याच्यासाठी हॉस्पिटल मधील संपूर्ण आयसीयु खाली केलं आहे. त्यापेक्षा त्याला मोकळे करा ना, जनता काय ते बघून पेईल. असे अनेक वाल्मीक कराड या समाजात आहेत. यांना तयार कोण करते? तर राजकीय लोक. जितके आत्तापर्यंत खून झालेत ते बंजारी समाजाचे आहेत. कराडचा जो आका आहे ज्याचे तो काम करत होता त्याला मंत्रिमंडळात ठेऊन तो कराड याची हॉस्पिटल मध्ये सेवा करत आहेत. अजूनही कराडचे मित्र पोलिस मध्ये आहेत. त्यांना बदली करण्याची हिम्मत कोणाच्या मध्ये नाही. त्याच्याकडे कोणत्या मंत्र्यांचे व्हिडिओ आहेत का? त्याला इतके का घाबरतात? या दोन कुटुंबाकडे बघितल्यावर खूप वाईट वाटते, ही लढाई देशमुख विरुद्ध कराड, वंजारी विरुद्ध मराठा अशी नाही तर ही माणुसकीची लढाई आहे. अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई आहे.
अख्या महाराष्ट्राला माहिती आहे कि सोमनाथ सुर्यवंशी कुठं आणि कसा मेला. ज्या दिवशी सूर्यवंशी कोठडीत मेला त्या दिवशी कर्तव्यावर असणारा इन्स्पेक्टर अद्याप खात्यात आहे. त्याला कोठडीत मारहाण झाली म्हणून तो मेला पण सांगण्यात आले की श्वसनाच्या त्रासाने मेला, पण हे खोटं आहे. हा फक्त जातीवाद आहे. अक्षय शिंदे ला मारला त्यानंतरही कोणीही समाजातील लोक बोलायला तयार नाही कारण त्याने बलात्कार केला. म्हणून पण खर तर त्याने बलात्कार केला नव्हता ज्याने केला होता त्यांना लपवण्यासाठी अक्षय शिंदे याचा बळी घेतला. माझा असा प्रश्न आहे की अक्षय शिंदे प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल केला नाही. दाऊदला देखील माहिती होत की पोलिस खरे भाई आहेत, म्हणून तो येथून निघून गेला कारण त्याला माहिती आहे त्याचा पोलिस कधीही गेम करतील. मागच्या ५ वर्षात पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे कारण पोलिसांच्या कामात राजकीय नेते जास्त हस्तक्षेप करत आहेत. महाराष्ट्रात आका संस्कृती जन्माला आली आहे. त्याने महाराष्ट्राचा सत्यानाश झाला आहे. वंजारी समाज खूप चांगला समाज आहे पण काही लोकांनी वंजारी समाज बर्बाद केला आहे. त्यामुळे जात पात सोडून अत्याचार विरुद्ध उभे राहण्याची गरज आहे. कराड आणि सुर्यवंशी यांना मारणाऱ्या पोलिस यांच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी शेवटी केले.
0 टिप्पण्या