ठाण्यातील महागिरी परिसरातील नव विशाल बौद्ध मित्र मंडळ आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले वाचनालय पंचांची चाळ आयोजित भारताचा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला सदर ध्वजारोहणं स्थानिक माजी नगरसेवक सुनील हंडोरे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी लहान मुलांना खाऊ देण्यात आला. शालेय लहान मुलासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक अजय पवार, चंद्रकांत घटवाळ काका. ad हिदयात मुकादम, सुभाष ठोंबरे, निलेश कोळी, दीपक ठक्कर, सुरेंद्र भोई, हेमंत भोईर, अनिल कोळी, मनोज जाधव, शशिकांत लोखंडे, योगेश कारंडे, अफझल तलवलकर सब्बीर भाई, किशोर बनकर, प्रवीण खैरलिया,, गणेश लोखंडे , शंकर मौर्या आणि प्राजक्ता सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
------------------------------------------
जिल्हा परिषद शाळा गोळेगाव, जुन्नर-पुणे हयांच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा
दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषद शाळा गोळेगाव, जुन्नर-पुणे हयांच्या अमूल्य आमंत्रणाच्या माध्यमाने विशेष सायबर तज्ञाच्या उपस्थितीने सायबर गुन्हे निर्मूलन शिबीर सन्मा.ठाणे शहर आयुक्त आशुतोषजी डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करत ग्रामीण भागात जनजागृती मोहीम पार पाडण्यात आली.भूमीकन्या सौं. निशा फुलसुंदर ह्यांच्या समाजकार्याचा विशेष सन्मान करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आले. आज आपल्या भारत देशाला सायबर गुन्हेगारीने वेढले आहे, सन्मा.उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि पोलीस आयुक्त आशुतोषजी डुंबरे साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी भागात शिबीर घेत असतो तरी मुख्यत: ग्रामीण भागात अश्या सायबर गुन्हेगारीविरुद्ध ज्ञान मिळून कायदेशीर मदत कशी मिळू शकेल ह्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू आणि ह्या शिबिराद्वारे देशाला प्रजासत्ताक दिनानिमित्त नमन करीत आहोत असे गणेश संपत तांबे ह्यांनी सांगितले
************************
शिवडीमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न
बौद्धजन पंचायत समिती मध्यवर्ती मंडळ, शिवडी गटक्रमांक १३ संलग्न सर्व शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रजासत्ताक दिनाचा अमृतमहोत्सवी वर्ष विभागाचे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर प्रसंगी धार्मिक विधी आदर्श बौद्धाचार्य प्रवीण तांबे, नरेश सकपाळे, मंगेश पवार, गौतम तांबे यांनी सुमधुर वाणीने पार पाडला, तद्नंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार व पुष्पसुमने अर्पण करण्यात आली, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश सकपाळे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी जगात अनेक देश लोकशाही, हुकूमशाही, धार्मिक सत्ता यावर चालतात ते देश कोण्या एका धर्माच्या अंमलाखाली आहेत परंतु जगात भारत हाच एक देश आहे जो विविध धर्म, पंथ, जाती, प्रदेश यात विभागला गेला आहे तरी या सर्वांना एका समता, बंधुता, मानवतेच्या धाग्यात बांधून एकसंघ ठेवण्याचे काम भारतीय संविधान करीत आहे, देशातील उच्च-नीच, गरीब-श्रीमंत सर्वच नागरिकांना जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग, व्यंग, अर्थ असा कोणताही भेदभाव न ठेवता समान अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिले आहेत, त्या संविधान व प्रजासत्ताक दिनाचे ७५ वे अमृतमहोत्सवी वर्षे बौद्धजन पंचायत समिती, शिवडी विभाग, गटक्रमांक १३ च्या वतीने आपण सादर करतोय, तसेच प्रजासत्ताक दिन चिरायू होवो व ही परंपरा अशीच कायम राहो" असे नमुद केले. सरतेशेवटी प्रजासत्ताक दिन चिरायू होवो अशा घोषणा देत राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
--------------------------------------------------
चित्रनगरीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा;
: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते आज सकाळी भांडार विभागाच्या समोरील परिसरात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी महामंडळातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रजासत्ताक दिन हा एक गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकतेची भावना दृढ करण्यासाठी चित्रनगरीतही अभिमानाने भारतीय ध्वजाची शान उंचावली गेली.दरम्यान चित्रनगरीत असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------
ठाणे महानगरपलिकेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन साजरा
भारतीय प्रजासत्ताकाचा ७६वा वर्धापन दिन ठाणे महानगरपलिकेच्यावतीने रविवारी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी मानवंदना दिली. राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजवंदनानंतर, ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त सौरभ राव यांनी सन्मान केला. लक्ष्मी भिमपा वालकरी, हरिश्चंद्र अण्णा डोंगरे, अनंत गणपत जाधव, दिनेश शांताराम महाडिक, अशोक बाळाराम पाबरे, बानू जयराम घुमाडिया, संतोष शंकर शिंदे, उषा अरुण पाटील, भाग्यश्री भगवान गायकवाड, लता जर्नादन गायकवाड या विविध प्रभाग समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. ध्वजवंदन सोहळ्यास, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे सर्व उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी आदी मोठ्या उपस्थित होते. प्रांगणातील सोहळ्यानंतर, महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याबरोबरच, महापालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच, मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास आणि कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे उपस्थित होते.

0 टिप्पण्या