महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. याच अनुषन्गाने हरी भक्त परायण वैकुंठवासी .श्री. गुरुवर्य वामनबाबा महाराज, हरी भक्त परायण वैकुंठवासी सद्गुरु सावळारामबाबा महाराज व हरी भक्त परायण वैकुंठवासी वासुदेव महाराज म्हात्रे, तसेच हरी भक्त परायण वैकुंठवासी वैराग्यमुर्ती राजाराम महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने दिवा येथील आगासन गाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बुधवार दि. ८ जानेवारी २०२५ ते शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ पर्यंत अखंड हरिनाम सोहळा आयोजित करण्यात आला . ह. भ. प. विनीत महाराज म्हात्रे यांच्या सुश्रव्य कीर्तनाने हरिनाम सोहळ्याच्या पहिल्या दिवसाला सुरवात झाली . यावेळी ह. भ. प. विनीत महाराज म्हात्रे यांनी भक्ती व नामाचे महत्व आपल्या रसाळ वाणीतून श्रोत्यांना पटवून दिले .समस्त मानवी जीवनास कल्याणकारी असणाऱ्या संतविचाराचा प्रचार प्रसार होण्याकरीता सदर सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील थोर विचारवंताची प्रवचने, किर्तन याचा श्रवणरूपी आस्वाद श्रोत्यांनी घेतला.
हरिनाम सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी ह. भ. प. एकनाथ महाराज सदगीर यांनी, पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा । डौर फिरवितो डुगडुग ऐका ॥ध्रु०॥ या संत एकनाथ महाराजांच्या भारुडावर सुश्रव्या कीर्तन करून श्रोत्यांची मने जिंकली.तर सांगता सोहळ्याच्या तिसऱ्या दिवसाची सेवा उच्च विद्या विभूषित तरुण कीर्तनकार ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत यांच्या कालाच्या कीर्तनाने झाली . काला हे त्याग,समर्पण, विश्वास,परीपुर्णतेचे किर्तन असुन सामान्य माणसाला प्रसाद रुपी काला हा काल्याचे किर्तनातुन मिळत असतो.भगवंताने अनेक प्रकारच्या लीला केल्या त्या लीलांचे वर्णन करून महाराजांनी भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या वाळवंटामध्ये जो काला केला तो काला देऊन सर्व गोपाळांना तृप्त केले. अशा पद्धतीने श्रीकृष्णाच्या अगाध लीलांचे विविध उदाहरणे, दाखले, प्रमाण, सिद्धांत देऊन महाराजांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
सांगता सोहळ्या प्रसंगी आमदार राजेश मोरे , माजी आमदार सुभाष भोईर , ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी , राष्ट्रीय कीर्तनकार रामदास महाराज चौधरी , माजी नगरसेवक अमर पाटील , दीपक जाधव , माजी नगरसेविका दर्शन म्हात्रे तसेच पंचक्रोशीतील हजारो वारकऱ्यांसह मोठया प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. या सोहळ्यासाठी ग्रामस्थ मंडळ आगासन यांचे विशेष सहकार्य लाभले
0 टिप्पण्या