शाहूवाडी, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामधील मोसम गावचे फौजदार पीएसआय अजय काशिनाथ कांबळे पाटील यांनी नाशिक येथे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांचे आगमन होताच शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात भव्य मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मांजरे ते मोसम अशी ही मिरवणूक डॉल्बीच्या संगीतमय गजरात मिरवणूकीने स्वागत करण्यात आले. कोल्हापुरी फेटे आणि महिलांनी आरती करून अजय कांबळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
नाशिक येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर फौजदार अजय कांबळे यांचे मांजरे गावात दुपारी स्वागत करण्यात आले. मांजरे गावात त्यांना हार फुले घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी त्यांना फुले, हार घालून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. मांजरे गावचे गोविंद श्रीपत कांबळे व अजय गणपत कांबळे यांनी उपस्थित ग्रामस्थांना भोजनाचा आस्वाद देवून हा आनंदोउत्सव द्विगणित केला. मांजरे गावचे तंटामुक्त अध्यक्ष दिपक कांबळे,पारिवणे गावचे नारायण पवार, गेळवडे गावचे रंगराव कांबळे, शाहूवाडीचे व्यापारी दिपक सोने, मांजरे गावचे शाळा केंद्र प्रमुख शिक्षक तुकाराम ऐनवाडकर,पारिवणेचे बबन भातडे ,पांडूरंग पवार यांनी स्वागत केले तर ईश्वर पवार यांनी अजय कांबळे यांना फेटा बांधून सहकुटुंब सन्मानित केले. मोसम गावामध्ये अजय पाटील यांचे मिरवणुकीनंतर जाहीर सन्मान सभा आयोजित करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी अजय पाटील यांचे कष्ट मेहनत आणि मिळालेल्या यशाचा गौरव केला. अजय कांबळे पाटील यांनी आपल्या यशामागे आई-वडिलांबरोबरच संपूर्ण कुटुंब मित्रमंडळी यांचे योगदान नाकारू शकत नाही, आयुष्यामागे त्यांचे पाठबळ आणि वडिलांनी दिलेली प्रेरणा आयुष्यामध्ये कधीही विसरू शकत नाही, असे सांगून उपस्थितांनी केलेल्या भव्य मिरवणुकीच्या स्वागताचे आभार मानले. भविष्यात समाजाला योग्य न्याय मिळविण्यासाठी माझ्या या पोलीस पदाचा वापर करून न्याय देण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन दिले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करीत मोसम गावात फौजदार पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मुलाचे यश पाहून त्यांचे आई अनुसया कांबळे पाटील यांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहिले, माझा मुलगा साहेब झाला आहे, त्याचा मला गौरव आहे, असे सांगून अजय यांचे तोंड भरून कौतुक केले. दरम्यान या आनंद उत्सव सोहळ्याला शाहूवाडी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी गैरहजर राहिल्याने ग्रामस्थ आणि बौद्ध समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रात अजय कांबळे पाटील यांचे यश नव्या पिढीसमोर आदर्शवत आहे, असे गौरवोद्गगार शेबवणे गावचे आनंद हरिबा कांबळे यांनी काढले
0 टिप्पण्या