भाईंदर पश्चिम येथे एसटी महामंडळाची फार मोठी जागा आहे.त्यातील काही जागा ही सीआर झेड क्षेत्रात येते. त्यापैकी ७ हजार ४०० मीटरची जागा आहे, त्या जागेवर बांधकाम करू शकतो . एसटी महामंडळाच्या ७ हजार ४०० मीटरची जागा ही मिरा भाईंदर महापालिका विकसित करेल. त्यातील ५० टक्के जागा ही मिरा भाईंदर पालिकेला त्यांच्या मालिकीची म्हणून ६० वर्षाच्या लीजवर देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचा प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या ठिकाणी महापालिकेने मच्छी मार्केट सुरु करावे. उत्तनच्या मच्छीमार बांधवांची मागणी होती त्यांना भाईंदर येथे मच्छी मार्केट हवे आहे. हे मच्छी मार्केट एअर कंडिशन असणार आहे.उरलेल्या ४० टक्के जागेत आरटीओ कार्यालय आणि एसटी महामंडळाची सुसज्ज कर्मशिअल इमारत उभारण्यात येईल. याठिकाणी पार्किंग, कार्यालय, कर्मचाऱ्यांसाठी ऑफिस, चार्जिंग स्टेशन आदी गोष्टींची पूर्तता करण्यात येईल. यासाठी १३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील काही खर्च हा मिरा भाईंदर महापालिका करणार आहे आणि काही खर्चासाठी राज्य शासनाला विनंती करणार आहोत, अशी माहिती परिवहन मंत्री महोदयांनी दिली. एसटी महामंडळ, आरटीओ आणि मिरा भाईंदर महापालिकेतर्फे एसटी कर्मचारी आणि नागरिकांना सुविधा देण्यासाठी एकत्रितपणे काम करेल.
भाईंदर पश्चिम येथील एसटी महामंडळाचे कार्यालय आणि मच्छी मार्केटसाठी लवकरात लवकरात राज्य शासनाची परवानगी घेऊन पुढील एक दोन महिन्यात मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या जागेचे भूमिपूजन करण्यात येईल, ८० हजार मीटरच्या एसटी महामंडळाच्या जागेत पार्किंग प्लाझाची ही सुविधा असणार आहे. स्टेशन पासून बस स्थानक जवळ असल्याने तेथे नागरिकांसाठी पे आणि पार्कींगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
0 टिप्पण्या