अखेर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले आहे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा खातेवाटप,आज हिवाळी अधिवेशही शेवटच्या दिवशी जाहीर झालं आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं असणार आहे, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं असणार आहे.
नागपूरमधील या शपथविधी कार्यक्रमात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राषट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षाच्या 33 नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचं खातेवाटत करण्यात आलं. त्यानुसार मंत्री आणि त्यांना मिळालेली खाती खालीलप्रमाणे आहेत.
एकनाथ शिंदे : नगरविकास आणि गृहनिर्माण
अजित पवार : अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क
चंद्रशेखर बावनकुळे : महसूल
राधाकृष्ण विखे पाटील : जलसंधारण
हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटील : उच्च तंत्र शिक्षण
गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा
धनंजय मुंडे : अन्न व नागरी पुरवठा
दादाजी भुसे : शालेय शिक्षण
गणेश नाईक : वनखातं
संजय राठोड : माती व पाणी परीक्षण खात
मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास
उदय सामंत : उद्योग व मराठी भाषा
जयकुमार रावल : विपणन
पंकजा मुंडे : पशुसंवर्धन आणि पर्यावरण
अतुल सावे : ओबीसी विकास, दुग्धविकास
अशोक उईके : आदिवासी विकास
शंभूराज देसाई : पर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
आशिष शेलार : माहिती व तंत्रज्ञान
दत्तात्रय भरणे : क्रीडा व अल्पसंख्याक विकास
अदिती तटकरे : महिला व बालविकास
शिवेंद्रराजे भोसले : सार्वजनिक बांधकाम
माणिकराव कोकाटे : कृषी
नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन
जयकुमार गोरे : ग्रामविकास आणि पंचायत राज
संजय शिरसाट : सामाजिक न्याय
भरत गोगावले : रोजगार हमी व फलोत्पादन
नितेश राणे : मत्स्य आणि बंदरे
प्रताप सरनाईक : वाहतूक
बाबासाहेब पाटील : सहकार
मकरंद पाटील : मदत व पुनर्वसन
प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण,
राज्यमंत्री, कोणाकडे कोणतं खातं?
माधुरी मिसाळ : सामाजिक न्याय,अल्पसंख्याक विकास वैद्यकीय शिक्षण
आशिष जयस्वाल : अर्थ आणि नियोजन आणि विधी व न्याय
इंद्रनील नाईक : उच्च आणि तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास
मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण
योगेश कदम : गृह राज्य शहर
पंकज भोयर : गृह निर्माण
नागपूर येथे १६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची आज, २१ डिसेंबर रोजी सांगता झाली. . पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबई येथे असणार आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रत्यक्षात ४६ तास २६ मिनिटे कामकाज झाले. अधिवेशनाला अधिकाअधिक ८७.८० टक्के सदस्यांची उपस्थिती होती, तर अल्प उपस्थिती ४८.३७ टक्के होती. एकूण सरासरी ७२.९० टक्के सदस्यांची उपस्थिती होती. अधिवेशनाच्या कालावधीत १० मिनिटे वाया गेली. प्रतिदिन सरासरी कामकाज ७ घंटे ४४ मिनिटे झाले. प्राप्त झालेल्या ३१६ औचित्याच्या सूत्रांपैकी १७७ वर चर्चा झाली. अधिवेशनात एकूण १३ विधेयके संमत करण्यात आली.
0 टिप्पण्या