नेरळच्या माथेरान व्हॅली इंग्लिश मीडियम शाळेने तंबाखू नियंत्रणासाठी केली माध्यमातुन जागरूकता..
भारत एज्युकेशन सोसायटीचे माथेरान व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल वंजारपाडा या शाळेने तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न शाळा कार्यक्रमांतर्गत वंजारपाडा गावात तंबाखू नियंत्रणासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. तरुणांमध्ये तसेच नागरिकांमध्ये तंबाखूच्या व्यसनांचं वाढलेलं प्रमाण बघता या रॅलीमध्ये तंबाखू नियंत्रणाविषयी घोषणा देण्यात आले.
या रॅलीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मृदुला पटेल यांनी देखील सहभाग घेतला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा प्रतिनिधी श्री राकेश कासारे तसेच श्री विशाल जाधव यांनी या रॅलीतील विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखूची सत्यता आणि तंबाखूला नाही म्हणण्याचं कौशल्य, स्वतःला आणि कुटुंबाला तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर कसे ठेवू शकतो याबाबत मार्गदर्शन केले.शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. स्वप्निल अडुरकर सर यांनी वंजारपाडा गावात रॅलीचे आयोजन केले.
0 टिप्पण्या