पंचशील बुद्ध विहार, धम्मशील बुद्ध विहार, पंचशील बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरखैरणे, लुम्बिनी बुद्ध विहार सामाजिक संस्था, उलवे, लुम्बिनी बुद्ध विहार , नेरूळ, नालंदा बुद्ध विहार, ऐरोली, सम्राट अशोक बुद्ध विहार, आरसीएफ, सम्राट अशोक महाविहार, सीबीडी, बुद्ध विहार प्रतिष्ठान वाशी इत्यादी संस्थांच्या विशेष सहकार्याने नवी मुंबई वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृह येथे भिक्खू संघाच्या वतीने शुक्रवार २७ डिसेंबर रोजी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विपस्सनाचार्य भदन्त संघकिर्ती महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली भदन्त प्रज्ञानंद थेरो यांनी या धम्मपरिषदेचे संयोजन केले होते. यावेळी मुंबई, नवी मुंबई व उपनगरातील अनेक भिक्खू आणि उपासक तथा उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या