Top Post Ad

नागरिकांना निवडणूक प्रक्रियामधील कागदपत्र तपासण्याचा आधिकार नाही

हरयाणा विधानसभा निवडणूक 2024 झाल्यानंतर तेथील एका वकिलांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात मागणी केली होती की निवडणूक चालू असतानाचे संपूर्ण video footage, त्याच पद्धतीने निवडणूक प्रक्रियेत होत असतानाचे सर्व पेपर यांची मागणी करण्यात निवडणुक आयोगाला करण्यात आली होती. The conduct of election rule 1951, मधील कलम 93(2)a नुसार निवडणूक संबंधी सर्व पेपर हे लोकांना अवगत करून देणे हे निवडणूक आयोगाचे काम होते आणि तसे त्या कायद्यात लिहिले होते. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयमध्ये निवडणूक आयोगाने हे देखील सांगितले की उमेदवार वगळता भारताच्या कुठल्याही नागरिकांना निवडणूक प्रक्रियामधील कागदपत्र तपासण्याचा आधिकार नाही.

  पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय येथील न्यायाधीश यांनी याच कलमाचा वापर करून निवडणूक आयोगाने हरयाणा विधानसभा निवडणूक २०२४ बाबतचे संपूर्ण कागदपत्र आणि विडिओ याचिकाकर्ते यांना देण्याचे आदेश ९ डिसेंबर २०२४ मध्ये दिले...निवडणूक आयोगाने ही बाब केंद्रात असणाऱ्या भाजप सरकारच्या निदर्शनात आणून दिली आणि २० डिसेंबर २०२४ रोजी म्हणजे पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा ९ दिवसात भाजपने संसदेत पुन्हा election Amendment Bill, २०२४ हे पारित केले.  या बिल नुसार, भाजप सरकारने वर नमूद केलेले The conduct of election rule 1951, मधील कलम 93(2)a  यात बदल घडवून आणले असून नवीन नियमानुसार निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया मधील संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग, footage आणि संपूर्ण कागदपत्रे भारताच्या नागरिकांना उपलब्ध करून देन्याचा अधिकारावर घाला घालण्यात आलेला आहे.

  • भारतातील लोकशाहीवर आघात करण्यासारख्या या घटना असून खालील काही प्रश्न उपस्थित होतात, की त्याची उत्तरं भारतातील नागरिकांनाच शोधावी लागतील.
  • - निवडणूक आयोग निवडणुकीतील सर्व विडिओ, फुटेज, आणि सर्व कागदपत्रे भारताच्या नागरिकांना आणि उमेदवारांना देण्यास का घाबरत आहे? 
  • - निवडणूक आयोगाची चूक पकडली जाऊ नये, म्हणून केंद्रातील भाजप सरकार संसदेत कुठलीही चर्चा न करता लोकशाहीला घातक ठरेल असे बिल का पास करत आहे? 
  • - भाजप आणि निवडणूक आयोग हे दोघे संगनमत करून भारताची लोकशाही संपवण्याचा प्रयत्न का करत आहेत? 
  • लोकशाहीला घातक ठरणाऱ्या अश्या या देशद्रोही राजकारणामुळे भारतीय लोकशाही ही खूप घातक वळणावर येवून थांबलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com