Top Post Ad

स्वच्छतेचे नियमभंग करणाऱ्यांकडून महापालिकेची दंड वसूली

 * मुंबई महानगरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी, विशेषतः धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने समर्पित प्रयत्न सुरू केले आहेत. वायू गुणवत्ता सुधारणा अभियान अंतर्गत आज, शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात, एकाच दिवसात १८९ मेट्रिक टन राडारोड्याचे (डेब्रीज) संकलन करण्यात आले. तर, सुमारे २४३ किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले. तसेच नियमभंग करणाऱ्यांकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.


   वातावरणातील बदलांमुळे बृहन्मुंबई क्षेत्रासह (मुंबई शहर आणि उपनगरे) मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊन वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक तत्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आली आहे

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

मुंबई महानगरात गत ५४ आठवड्यांपासून संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरुप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात (वॉर्ड) नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण २२७ स्थानिक संस्था प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. या अंतर्गत आज (दिनांक २८ डिसेंबर २०२४) सर्व प्रशासकीय विभागात लोकसहभागातून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

यामध्ये, १ हजार ६८२ कामगार, कर्मचा-यांनी १९०  संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, मेकॅनिकल स्वीपर, ई-स्वीपर, लीटर पीकर मशीन, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध आणि फायरेक्स मशीन, मिस्टींग मशीन यासह अन्य अद्ययावत यंत्रणा दिमतीला होती.दरम्यान, स्वच्छतेचे नियमभंग करणाऱ्या नागरिकांकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com