आघाडी.महाडचा पहिला सत्याग्रह झाला तेव्हा लोक घरी निघाले असताना त्यांच्यावर जातीवादी हिंदुबामणांकडुन जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्याचा प्रतिकार बाबासाहेबांनी तेव्हा करु दिला नाही. सयंम ठेवायला सांगितला. त्याचं कारण आपल्याकडे पोलीस यंत्रणा, समाज सहानुभूतीने बघत नव्हता. आणि एकाच वेळी ब्रिटिश सरकार व सवर्ण हिंदु अशा दोन्ही शत्रू सोबत लढणं शहाणपणाचं नव्हतं. बाबासाहेबांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला आणि घटनेच्या काही महिने न्यायलयिन लढा लढुन जातीवाद्यांना तुरुंगात टाकलं आणि त्याच वर्षी काही महिन्यांत परत डिसेंबर १९२७ मधे महाडची दुसरी परिषद भरवली. परिषदेला १५ हजार लोक आलेले होते. गावकऱ्यांनी वस्तु खाण्यापिण्याच्या गोष्टी विकायला नकार दिला होता. महाडला स्वयंपाकी भांडी सुद्धा मुंबईवरून बोटीने मागविले होते. भांडे पोहचायला वेळ लागला म्हणून पहिल्या दिवशी खायला काहीच नव्हते तर फक्त फुटाने वाटले होते. बाबासाहेबांनी स्वतः हाताच्या पशीत फुटाणे घेऊन जमीनीवर बसले होते लोका सोबत. महाडच्या दुसऱ्या परिषदेला तोबा गर्दी बघुन गावातले बामण मराठा गाव सोडुन पळुन गेले होते असा १९२७ चा ब्रिटिशाचा पोलीस डायरी रिपोर्ट आहे. पण तरीही बाबासाहेबांनी शक्ती प्रदर्शन केलं नाही. मार्च व डिसेंबर या १९२७ च्या महाड भाषणात त्यांनी शिक्षण नौकरी स्वाभिमान समाज क्रांती याच keyword वर भाषण केलं, लोकांचं प्रबोधन केलं. महाडच्या दुसऱ्या परिषदेला १५ हजार अस्पृश्य तिथे जमलेले असताना आणि गावातील बामण मराठा घरं सोडुन पळुन गेलेले असताना सुद्धा उन्मादात तिथे उरलेल्या लोकांवर कोणी काही केलं नाही. हा लढा बाबासाहेब पुढे १० वर्षें लढले आणि जिंकले सुद्धा. १९३९-४० मधे बाबासाहेबांना महाड नगरपालिकेने ठराव करुन बाबासाहेबांना मानपत्र देऊन सन्मान ही केला होता.
समाज पोलीस न्याय मिडिया कुठेच तुमच्याबद्दल सहानुभूती नसताना आणि आपल्या लोकाचं कमीतकमी नुकसान असणारं आंदोलन चालवायला आपण शिकणार कधी? बाबासाहेबांचं आंदोलनाचं मॉडेल आपण स्वीकारणार कधी? संसदेत व न्यायलयिन यंत्रनेकडुन रोज तुमचे संविधानिक अधिकार संपवले जात आहे तेव्हा तुम्हाला विटंबना वाटत नाही? तेव्हा तुम्हाला राग चीड येत नाही? आणि दगडात कोरलेलं संविधान शिल्प तोडलं म्हणून एवढा राग? ज्याने शिल्प तोडलं त्याला चार लोकांनी चोपुन पोलीसांना सोपवुन पुढे मास्टर माईंड शोधुन काढा म्हणून शांततेत हजारोंच्या संख्येने निवेदन देऊन सरकारवर दबाव वाढवता आला नसता का ? आंदोलन भरकटवणं काय मोठी गोष्ट नाही सत्ताधारी वर्गासाठी. संघोट्याच्या गळाला लागलेले १०० लोकांना हजार रुपये देऊन तोडफोड करायला लावुन, अख्खा समाजाचं कोम्बिंग ओपरेशन करुन त्यांना शासकीय अट्रोसिटीचं लायसेन्स दिलं जातं. आणि सरकार मुळ गुन्हेगाराला शोधण्याची जबाबदारी सहज झटकु शकतो.
पहिली गोष्ट अस्मितेत असं अडकु नका. आंदोलन करण्याची वेळ आली तर आपल्यातले शेन खाणारे कोण ते ओळखुन चोपा. आणि शक्य तितकं बाबासाहेबांचं आंदोलन मॉडेल कसं होतं ते अभ्यासा. तुम्हाला संविधान शिल्प तोडलं म्हणून राग आला पण मनुस्मृती जाळुन स्व लिखित संविधान या देशाला त्यांच्याच हयातीत स्वीकारायला लावणारे बाबासाहेबांचा राग तो revenge आपल्या पेक्षा कोटी पटीने मोठा होता. कशातही घायाळ होऊ नका, घाव कुठे घालायचा ते पण शिका.
- राहुल पगारे
0 टिप्पण्या