वंचित बहुजन आघाडीच्या EVM विरोधात स्वाक्षरी मोहीमेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वाक्षरी करत सुरुवात केली. त्यांनतर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात EVM विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. EVM च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. EVM च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे..
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथून या स्वाक्षरी करून ईव्हीएम विरोधातील जनआंदोलनाला सुरुवात केली. मुंबई येथे आज ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली असून. 'वंचित'चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगिले की या ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहेत. जो पर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर घेत नाही तो पर्यंत वंचित बहुजन आघाडी माघार घेणार नाही हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे.
जे पक्ष सत्तेत असताना ईव्हीएम ची बाजू घेत होते आणि आता सत्तेत नसल्यावर ईव्हीएमला विरोध करत आहेत. जर ईव्हीएम विरोधात लढा लढलो तर बॅलेट पेपर वर निवडणुका घेता येईल, बाळासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत की जोपर्यंत ईव्हीएम रद्द करून निवडणुका बॅलेट पेपर वरती घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.
राज्यभर ईव्हीएम विरोधात जनआंदोलन सुरू केले आहे स्वाक्षरी मोहीम राबवली आहे टप्याटप्याने आंदोलनाची तीव्रता ही वाढत जाणत आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम हटवून या देशाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी मदत करावी असे मत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मांडले आहे.
0 टिप्पण्या