10 डिसेंबर रोजी परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली. ज्याने ही नासधूस केली ती व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे जाहिर करून त्याच्यावर तकलादू कारवाई करण्यात आली. मात्र या घटनेच्या निषेधार्थ संविधान देशप्रेमी अनुयायांनी 11 डिसेंबरला शहरात शांततेत बंद पुकारला. मात्र या बंदला हिंसक वळण देण्यात काही समाजकंटकांचा हात होता. ते जाणिवपूर्वक घडवण्यात आले होते अशी चर्चा आता परभणीत होत आहे. शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनी लागलीच केवळ आंबेडकरी समुदायाला टारगेट करून धरपकड केली. असा आरोप परभणीतील सर्वसामान्य जनता करीत आहे. इतक्यावरच पोलीस थांबले नाही तर आंबेडकरी वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून तिथल्या नागरिकांना मारहाण केल्याचा आरोपही कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. सोमनाथ सुर्यवंशी याचा पोस्टमार्टम रिपोर्ट काय सांगतो? कोम्बिंग ऑपरेशन करत असताना जे निष्पाप आहे, ज्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही, अशा लोकांचे घर तोडले, दरवाजे तोडले. जो दिसेल त्याला मारलं, महिला सोडल्या नाही की लहान मुलं सोडले नाहीत. वत्सलाबाई मानवटे या गरीब महिलेला केलेली मारहाण हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे.
न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचे छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाची सर्व प्रक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली आहे. याच शवविच्छेदनातून सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत असाताना त्याला हृदयविकाराचा झटका आला, असा दावा करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदनाच्या रिपोर्टनुसार सूर्यवंशीच्या मृत्यूचे कारण हे Shock following multiple injuries असे आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सूर्यवंशीचा मृत्यू मार लागल्याच्या धक्क्यातून झाल्याचे शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये नमूद आहे. सोमनाथ सूर्यवंशी हा एक विद्यार्थी होता. त्याने परभणीतील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला होता. सध्या त्याच परीक्षा चालू होती. त्यामुळेच तो पुण्यातून परभणीत आला होता. मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी हा एएलबीच्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. तर सोमनाथ शूर्यवंशीच्या आधार कार्डवरील माहितीनुसार तो मूळचा पुण्याचा रहिवासी होता. त्याचं पूर्ण नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असे होते. त्याचा जन्म 23 जुलै 1989 रोजी झाला होता. तर आधार कार्डवर नमूद पत्त्यानुसार तो पुण्यातील भोसरी या भागात राहायचा
या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा आणि न्यायालयीन चौकशी करावी."आज जरी कुण्या मोठ्याचं लेकरु असतं तर मारलं असतं का? त्यांच्या पोटातल्या लेकराला मारतील का ते? मला न्याय पाहिजे आता. जे जे कुणी माझ्या लेकराचा घात केल्यात, त्यांची सगळ्याची वर्दी उतरवायचं. सगळ्यांना सस्पेंड करायचं आणि घरी पाठवायचं."- विजया सूर्यवंशी (सोमनाथची आई)
सोमनाथ आणि इतरांना मारहाण करणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाई करावी.
सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारनं 50 लाखांची मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी.
जखमींवर उपचार करावेत आणि त्यांना आर्थिक मदत करावी.
पोलिसांच्या कारवाईत ज्यांचं नुकसान झालंय, त्यांना नुकसानीचा मोबदला द्यावा.
एका व्हायरल व्हीडिओत पोलीस ऑटोरिक्षावर काठ्या मारताना दिसत आहेत याबाबत शहनिशा व्हावी. इत्यादी मागण्यांकरिता अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने विधानभवनावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता इंदोरा चौक ते नागपूर विधानभवन येथे आयोजित या मोर्चामध्ये सर्व संविधान देशप्रेमी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कॉम्बिंग ऑपरेशनच्या काही तासात पोलिसांकडून जी घरे फोडण्यात आली त्यावर कारवाई करावी. पुतळ्याच्या आसपास लाठी चार्ज केला गेला तो पोलिसांनी केला की पोलिसांच्या वेशातील दुसऱ्या कोणी केला हे शोधणार. द्वेष आणि धर्म या दोन गोष्टी कोणाच्यातरी डोक्यामध्ये बसणार आहेत. ज्याच्या कोणाच्या डोक्यामध्ये या गोष्टी बसणार आहेत, तो बेकाबू होणार आहे. या ठिकाणी काही पोलीस आपण बेकाबू झालेले पाहिले आहेत. जो पोलीस बेकाबू झालेला आहे, त्याच्या डोक्यामध्ये धर्म किंवा द्वेष पेरला गेलेला आहे. जसं काही जणांनी कायदा आपल्या हातात घेतला आणि लोकांना बडवायला सुरुवात केली. ही परिस्थिती आता आपल्या देशामध्ये वाढत जाणार आहे. हे थांबेल असं वाटत नाही.--- प्रकाश आंबेडकर.ज्यांना ज्यांना मारले आहे त्यांच्या केसेस जिल्हा न्यायालयात दाखल करण्याच्या सर्व वकिलांना सूचनाही प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या.
"कस्टडीत असो की विदाऊट कस्टडी मारहाण योग्य नाहीच. एखाद्या ठिकाणी जमाव असेल तर तो पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातो. पण लाठीचार्ज करण्याआधी जाहीरपणे लाऊडस्पीकरवर सांगितलं जातं आणि मग लाठीचार्ज केला जातो." - माजी आयपीएस अधिकारी शिरीश इनामदार
परभणीच्या घटनेने मन सुन्न्न होतं, संताप येतो, बदला घ्यावा ही भावना अत्यंत प्रबळ होते, ब्राम्हण्यांनी आंबेडकरी समाजाबद्दल प्रचंड द्वेष पसरविला, कोर्ट, पोलीस, मीडिया, शासन, प्रशासन ब्राम्हण्यांच्या ताब्यात आहे, जे खरे आरोपी आहेत त्यांना मोकळं रान दिलं गेलंय पोलीस फक्त आपल्याच लोकांवर जुलूम करतंय, कोम्बिंग ऑपरेशन करतंय, जे भारताच्या सीमेवर अतिरेक्यांसाठी केलं जातं त्या साठीच फडणवीस गृह खातं स्वतःकडे ठेवतात, संविधानाच्या रक्षकावर पोलीस हल्ला करतात, त्यांना ठार मारतात दुर्दैवाने आंबेडकरी म्हणवणारे नेते? बीजेपी च्या पायाशी लिन झाले, कुणी उघड, कुणी छुपे, लढू या, सनदशीर मार्गाने मनूवादी, व त्यांच्या गुलाम झालेल्या अतिरेक्यांविरोधात,
भारत?देश झिंदाबाद - राजाराम खरात
0 टिप्पण्या