विविध समाोपयोगी कार्यांसोबतच कीर्ती महाविद्यालय राष्ट्रिय सेवा योजना विभाग सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करते ह्यात गावाच्या सर्वांगिण विकास करण्यासोबतच स्वयंसेवकांचा ही व्यक्तिगत पातळीवर विकास करण्यावर भर दिला जातो.तर या वर्षीचं विशेष शिबीर 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर शिवणसाई ( पनवेल ) या गावी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन कीर्ती महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकुश दळवी आणि प्रा. पूजा कांबळे यांनी केले होते.कीर्ती महाविद्यालचे प्राचार्य एम. एस. जोग आणि उपाप्राचार्य मीनल मापुस्कर यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने विशेष शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.
या शिबिरात स्वयंसेवकसाठी विविध सत्राचं आयोजन करण्यात आले होते. पण त्या सोबतच श्रमदानाचं कार्य नियोजन केलं होतं.या सत्राचं आणि श्रमदानाचं उद्देश स्वयंसेवकाचं सर्वांगीण विकास व्हावे आणि त्यांना आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे याचे भान यावे.सकाळी श्रमदानं आणि दुपारी सत्र असे संपूर्ण वेळपत्रक ठरले होते. स्वयंसेवाकाचं आरोग्य निरोगी राहावे म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात हार्टफुलनेस या संस्थेद्वारा योगमुद्रा आणि प्राणायामने होत असे.मग सकाळच्या न्याहारी नंतर स्वयंसेवक श्रमदान करीत असत. या श्रमदानात त्यांनी तिथल्या रस्ता व्यवस्थित केला आणि नदीवर बांध बांधला.
तसेच गावाच्या शाळेकडील परिसर स्वच्छ केला. दुपारी स्वयंसेवकाचं अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग,मावा संस्थेच सुरक्षितता वर एक सत्र झालं. ते अनुक्रमे प्रकृती फॉउंडेशनच्या प्रतिनिधी मीना गायकवाड आणि मावा फॉउंडेशनचे प्रतिनिधी प्रवीण तोटे यांनी घेतले. या सत्रात स्वयंसेवाकांना सतर्कता आणि सजगतेची शिकवण मिळाली. संद्याकाळी RTI (PCGT) म्हणजेच माहितीचा अधिकार, अंधश्रद्धा निर्मूलन, लेप्रोसी असे सत्र झाले. ते अनुक्रमे स्वप्नील शिरसाठ, राजू कोळी आणि नीलकंठ कोळी यांनी घेतलं. RTI च्या सत्रात स्वयंसेवाकांना RTI फाईल करायला शिकवले. अंधश्रद्धा निर्मूलनच्या वेळी प्रत्येकाला आपल्या जबाबदारी जाणीव झाली. त्याचबरोबर स्वयंसेवाकांनी शांतीवनास भेट दिली आणि स्टार गेझिंग सारख्या मजेदार सत्रात आवर्जून हजेरी लावली. स्टार गेझिंग हे सत्र प्रकाश पारखी यांनी घेतले.
या सत्रात स्वयंसेवाकांच्या मनात आकाशात असणाऱ्या तारका विषयीं कुतूहल जागे झाले. त्यांना बरीच माहिती मिळाली. स्वयंसेवाकांनी आणलेल्या वह्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेत डोनेट करण्यात आल्या. त्याच बरोबर त्या लहान मुलासोबत वेळ घालवला. एकूण प्रत्येक सत्र स्वयंसेवाकांना काही ना काही तरी शिकवत होते. प्रत्येक सत्र खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.ह्या संपूर्ण शिबीरात माजी स्वयंसेवक आणि द्वितीय वर्षीय स्वयंसेवाकही सोबत होते. त्यांनीही या शिबिराला लागेल ते सहाय्य केलं.
तसेच त्या गावाचे रहिवासी. विश्वास पाटील भाऊ आणि.विजय पाटील भाऊ यांनीही या शिबिराला फार मोठी मदत केली.या शिबिराला कीर्ती महाविद्यालयाच्या प्रा. अंकिता व प्राजक्ता, प्रा. श्रद्धा पडियार, प्रा. वैभवी, प्रा. अस्मिता जाधव आणि प्रा. रोहन सर यांनी भेटी दिल्या. त्यांचेही मोलाचे मार्गदर्शन स्वयंसेवकांना लाभले.एकूण हे शिबीर स्वयंसेवकांसाठी अविस्मरणीय, अदभूत आणि खूप नवीन गोष्टी शिकवण्यासारखा होता.
- अल्ताफ शेख
- एफ वाय बी ए
- कीर्ती महाविद्यालय
0 टिप्पण्या