दहा डिसेंबर या जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त साऊ संगिती असंघटित कामगार युनियनच्या वतीने दहा डिसेंबर रोजी डोंबिवली इथे घर कामगार महिलांचा एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. युनियनचे अध्यक्ष राजू शिरधनकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात परिसरातील शेकडो महिला आवर्जून उपस्थित होत्या.
या मेळाव्यात घर कामगार महिलांचे घटनात्मक अधिकार,स्वसन्मान,कायदेशीर लढाई,घरेलु कामगार चळवळीचा इतिहास आणि वर्तमान स्थिती या विषयावर जाणकारांनी मार्गदर्शन केले.त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि कार्यकर्ते रवि भिलाणे,कामगार नेते कोम्रेड काळू कोमासाकर,ॲड.सुधा भारद्वाज,ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री छायाताई कोरेगावकर आणि घरेलु कामगार समन्वय समितीचे विजय खरात आदी उपस्थित होते.युनियनचे कोम्रेड शरद निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. घरेलु कामगारांच्या मागण्यांसाठी तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार करूनच मोठ्या उत्साहाने उपस्थित महिला घरी परतल्या
0 टिप्पण्या