राजु तोडसाम यांची आमदार की रद्द करणे, गुन्हे दाखल करुन तपास आयकर विभागाकडे देवून दंडासह रक्कम वसुल करण्याची गंभीर तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे दाखल करण्यात आली असल्याची माहिती रजनीकांत बोरेले यांनी दिली आहे
तसेच पांढरकवडा राजु तोडसाम यांच्या विरुध्द राज्य निवडणूक आयोग मुंबई, जिल्हा निवडणूक अधिकारी यवतमाळ व निवडणूक निर्णय अधिकारी केळापूर यांच्याकडे डेव्हिसल ब्लोअर रजनीकांत डालुराम बोरेले यांनी गंभीर स्वरुपाची पुराव्यानिशी तक्रार दि. 4/12/2024 रोजी दाखल केली होती. ह्या अधिका-यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार, प्रदेश अध्यक्ष भाजपा तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे दि. 9/12/2024 रोजी तक्रार दाखल करुन यथाशिघ्र कार्यवाहीची मागणी केली आहे.
सन 2024 च्या आणी केळापूर विधानसभा मतदारसंघातून राजू तोडसाम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतांना शपथपत्र दाखल केले आहे त्यात खोटी, दिशाभूल फसगत करणे, गुपीत ठेवण्यासारखे शपथपत्र दिले आहे. सन 2019 च्या व 2024 च्या शपथपत्रात दिलेली माहिती मध्ये तफावत आहे. त्यांनी पत्नी बाबत संक्षिप्त माहिती दिली आहे. पत्नी अर्चना तोडसाम कि प्रिया तोडसाम याचा खुलासा केलेला नाही. सन 2019 च्या शपथपत्रात 40,54,802/- रुपयाचे कर्जबाजार होता. विविध बैंकेत 2,73,018/- रुपये होते. विशेष म्हणजे सन 2014 मध्ये पहिली निवडणूक लढली त्यावेळेस शपथपत्र दिले त्या शपथ पत्रात राजू तोडसाम यांनी स्वतः चे व्यवसाय खाजगी दाखविले आणि पत्नी अर्चना राजू तोडसाम हिचे नावाने असलेले त्यावेळीचे घर 65 लक्ष रुपयाचे दाखविले. सन 2014,2019, 2024 या तिन्ही शपथपत्राचे अध्ययन केले असता प्रचंड तफावत आणि खोटी आणि दिशाभूल केली असल्याचे शपथपत्रावरुन सिध्द होते.
पत्नी प्रियाच्या नावे सन 2018 ला आणी चे घर खरेदी व त्यावर बांधकाम असे एकूण 17,91,642/- रुपये चे दाखविले व 450 ग्रॅम सुवर्ण किंमत 17,55,000/- दाखविले. हेच घर सन 2024 च्या शपथपत्रात खरेदीखत असलेली रक्कम 29 लक्ष रुपये दाखवित आहे. याशिवाय सन 2024 च्या शपथपत्रात नागपूरचे घर 75 लाख रुपये, चारचाको वाहन 8 लाख रुपये व हातातील रक्कम मॅच्युअल फंड, विविध खात्यातील रक्कम वेगळी दाखविली. सन 2018 ला प्रियाचे उत्पन्न 2,85,140/- रुपये होती तर सन 2022 ला 3 लाख 9 हजार 830 रुपये दाखविले. प्रियाचा व्यवसाय गृहीणी आहे.
याशिवाय राजू तोडसाम यांनी स्वतःचे सन 2022 चे उत्पन्न 7 लाख 41 हजार 840 रुपये दाखविला त्यात मांजा कॉधारा ता. केळापूर येथे गट क्र. 117/1/ब एकूण 5 एकर जमीन 5 लाख रुपये मध्ये विकत घेतली व स्वतःचा व्यवसाय शेती दाखविली. शपथपत्रात शेतीवर बांधकाम निरंक म्हटले आहे. परंतु शेतीवर पक्की बांधकाम असलेली इमारत, जनावरांचे टिन शेड, विट भिती बांधकाम आणि टिन शेड गोठा असे 35 ते 39 लक्ष रुपयाचे बांधकाम केलेला आहे. शिवाय स्वत:कडे 35 ग्रॅम सोने आणि विविध बैंक खात्यात रक्कम 35 ते 36 लाख रुपये शिल्लक व सन 2024 च्या निवडणूकीत लक्षावधी रुपये अधिकृत खर्च केले ते वेगळे अशी चल अचल संपत्ती कोट्यावधी रुपयाच्या घरात चालली आहे.जर 5 एकर शेती मध्ये राजु तोडसाम याला लक्षावधी रुपयांचा उत्पन्न होत असेल तर त्यांनी मतदार संघातील शेतक-यांना असा प्रशिक्षण दयावे जेणेकरुन शेतक-यांचे आत्महत्या थांबतील.
याशिवाय राजु तोडसाम याने शपथपत्रात हिंदू अविभक्त निरंक नमुद केला आहे आणि पत्ता उत्तरवार ले आऊट पांढरकवंडा असा दिला आहे तो घर पत्नी अर्चना राजु तोडसाम हिचे नावाने आहे. तिचे बाजार मूल्य ।, कोटीच्या घरात आहे. अर्चनाचे घर, बैंक खाते, सुवर्ण दागिने याबाबत कोणतीच माहिती शपथपत्रात नमूद नाही, पत्नी अर्चना आहे कि प्रिया आहे हे संभ्रमात ठेवले आहे. प्रत्यक्षात मतदान केंद्रावर अर्चना, सासू, मुलगा आणि पती राजू तोडसाम मतदान करतांना छायाचित्रात दिसत आहे तर पत्नी प्रिया पती राजू तोडसाम ला टिळा काढतांना दिसत आहे.
सन 2019 च्या शपथपत्रात राजु तोडसाम 40 लाख 54 हजार चा कर्जबाजारी होता कर्ज फेडुन सन 2024 मध्ये कोट्यावधी रुपयांचा मालक दिसत आहे. अशा प्रकारे आयकर विभागाची सुध्दा दिशाभूल करुन शपथपत्रात दिलेली माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी दिली आहे त्यामुळे निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी केळापूर यांची सुध्दा फसवणूक केली परंतु त्यांनी सुध्दा कोणतीच कार्यवाही अदयाप पावेतो केली नाही. त्यामुळे आपण स्वतःहून गुन्हे दाखल करणे, आमदारकी रह करणे व आयकर विभागाकडे तपास वर्ग करुन आयकर विभागाचे झालेले आर्थिक नकुसान दंडासह रक्कम वसुल करुन कोषागारात जमा करावे अशी गंभीर तक्रार पुराव्यानिशी रजनीकांत बोरेले व्हिसल ब्लोअर, आर.टी.आय. कार्यकर्ता यांनी मागणी केली आहे. तक्रारीसोबत सन 2014, 2019, 2024 चे शपथपत्र सुध्दा जोडले असल्याची माहिती रजनीकांत डा. बोरेले यांनी दिली
0 टिप्पण्या