महाराष्ट्रातील पाच मुख्य विभाग मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या विभागातील महिलांना हवामान बदलासंबंधित वेगवेगळ्या संकटांना कसा सामना करावा लागत आहे? हे समजून घेऊन हवामानविषयक समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना आखाव्यात असे आवाहन आज महाराष्ट्रातील रिसोर्स अॅड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट" (RSCD) आणि "बाईमाणूस मीडिया रिसर्च फाउंडेशन" यांनी केले. महाराष्ट्रातील विधानसभा २०२४ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला व हवामान बदल या मुद्यावर काम करणाऱ्या संस्था आणि बस्ती गावं पातळीवरील महिला नेत्यांनी राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी "महिला आणि हवामान बदलावरील जनतेच्या मागण्यांची सनद तयार केली आहे. महाराष्ट्रातील विविध स्थानिक समुदाय आणि गटांच्या सहकायनि रिसोर्स अॅड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट" (RSCD) आणि "बाईमाणूस मीडिया रिसर्च फाउंडेशन" यांच्या संयुक्त विद्यमाने ही सनद तयार करण्यात आली आहे. ही सनद, दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी, मुंबई प्रेस क्लब या ठिकाणी प्रसिद्धी माध्यमांसमोर प्रकाशित करण्यात आली. संबंधित विषयावर काम करणाऱ्या स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी, तळात काम करणारे कार्यकर्ते, महिला सरपंच, विविध सामाजिक संस्था व नागरी संस्थांचे सदस्य यानी या सनद निर्मितीत विशेष असे योगदान दिले आहे
महाराष्ट्राला सतत बदलत्या हवामानविषयक असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने प्रचंड दुष्काळ, पूर आणि तापमानवाढीसारख्या या सर्व संकटांचा अधिक ताण महिलांवर येत आहे, असे उपस्थित संवादकर्त्यांनी सांगितले. विशेषतः आर्थिकदृष्टया वंचित समुदायांमधील महिला ज्याच्यावर घर सांभाळण्याची अधिक जबाबदारी असून त्याच खऱ्या कर्त्याधर्त्या असतात. महिला केंद्रित हवामानबदलाविषयी सुसंगतता साधण्यासाठी या सनदीमध्ये एकूण सात मुख्य मागण्या मांडल्या आहेत. या सनदीद्वारे, महिलांना स्थानिक आणि राज्यस्तरीय हवामान मंडळे व निर्णय घेणाऱ्या समित्यांमध्ये नियोजनापासून प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, अन्न, पाणी आणि म्वच्छतेच्या संदर्भातील महिलांच्या समस्या समजून घेऊन हवामान संकटांचा सामना करणाऱ्या उपाययोजना आखाव्यात. याशिवाय, असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी हवामानव आपत्ती प्रतिरोधक असणारी घरकुल रचना आणि आर्थिक संरक्षणाची व्यवस्था करण्याची मागणी केली गेली. याठिकाणी असेही नमूद करण्यात आले की, ऊर्जा संक्रमणामुळे प्रभावित होणाऱ्या महिला समुदायांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व उपक्रमांची आखणी करणे गरजेचे आहे. या ठिकाणी असाही प्रस्ताव मांडण्यात आला की, महाराष्ट्र राज्य हवामान सेलच्या अंतर्गत "लिंग आणि हवामान कार्यगटाची" स्थापना करणे गरजेचे आहे जो हवामान धोरणाचे स्त्री-पुरुष समानता आधारित अंमलबजावणीवर देखरेख करेल.महाराष्ट्रात हवामान बदलाचे गंभीर परिणाम आपण पाहतोच आहोत, दिवसेंदिवस वाढणारे कोरडे वारे, तापमानवाद आणि अनियमित पाऊस वा संकटांचा महिलांवर सर्वात मोठा परिणाम होत आहे कारण त्यांना पाण्यासाठी मैलोनमैल चालावे लागते आणि कृषी संकटामुळे शेतात अधिक वेळ घालवावा लागतो. डॉ. कविता बरे, सनद मसुदा समिती सदस्य व सरपंच किसल ग्रामपंचायत, ठाणे यांचे मत असे होते की, महिलांवर होणाऱ्या परिणामांचा कोणत्याच धोरणात विचार होतांना दिसत नाही म्हणून आम्ही या सनदी द्वारे व स्थानिक पंचायत स्तरातील कामांतून हे बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आर.एस.सी.डी संस्थेचे संचालक भीम रासकर म्हणाले कि, पर्यावरण कारभारणी अभियानातील सदस्यांनी राज्यातील अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व प्रवक्त्यांशी भेट घेतली आणि त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये या मनदी मधील मागण्या समाविष्ट करण्यासाठी विनंती केली. अनेक पक्षांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोणताही पक्ष सत्तेत येवो, महिला व हवामान बदलाचा मुद्दा आणि विशेषतः महिलांच्या असुरक्षिततेचे निराकरण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा विषय राजकीय आणि सामाजिक सहकार्याच्या माध्यमातून हाताळला जावा.
अप्सरा अगा, पत्रकार पुणे यांनी सांगितले की, "हवामानाशी संबंधित कोणत्याही संकटात किंवा आपत्तीत महिलांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. पुण्यातील पूर परिस्थितीवर त्यांनी केलेल्या अहवालानुमार, झोपडपट्टीतील महिलांना पुरामुळे आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधांची कमतरता भासते. म्हणून हवामान संकटाचा सामना करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण नियोजन महिला व बाल केन्द्री होण्यासाठी महिलांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे." गेल्या दोन वर्षांपासून बाईमाणूस आणि आर.एस.सी.डी संस्था महाराष्ट्रातील विविध विभागातील महिलांना हवामान बदलाबाबत नेतृत्व करण्यासाठी आणि त्यांची क्षमता बांधणी करण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत. बाईमाणूस संस्थेने अनेक महिला नेत्यांना हवामान बदलाच्या विविध पैलूंवर स्थानिक स्तरातील वार्तांकन करण्यासाठी तयार केले आहे. तर आर.एस.सी. डी ने राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये सुमारे 250 "हवामान गाव संवाद" आयोजित केले आहेत. या अनुभवांच्या आधारे या दोन संस्थांनी महिलांच्या हवामान बदलाच्या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण मागण्यांची सनद तयार केली.
- अधिक माहिती करिता
- 1) मालती सागणे, समन्वयक, पर्यावरण कारभारणी अभियान (मोब: 9420869336)
- 2) डॉ. कविता वारे, सरपंच, किसळ पारगाव ग्रामपंचायत, ठाणे (मोब: 7709667016)
- 3) प्रशांत पवार, संचालक बाईमाणूस (मोबः 9930803328)
- 4) भीम रासकर, संचालक, आर.एस.सी.डी (मोब: 9869259194)
- 5) सुरज पटके, सोशिअल मिडिया मॅनेजर, बाईमाणूस (मोबः 9307309270)
संस्थाबद्दल ..... बाईमाणूस मीडिया रिसर्च ही महाराष्ट्रातील एक माध्यम संस्था आहे, जी वंचित आणि असुरक्षित समुदायातील महिलांना महत्त्वाच्या विविध मुद्यांवर वार्तांकन करण्यासाठी प्रशिक्षण देते आणि व्यासपीठ उपलब्ध करून देते. गेल्या अडीच वर्षांपासून, बाईमाणूस मीडिया रिसर्च फाउंडेशनने महाराष्ट्रातील महिलांवरील हवामान बदलांच्या परस्पर संबंधांवर सातत्याने वार्ताकन केले आहे. 'प्रोजेक्ट धरित्री' अंतर्गत, ज्यामध्ये हवामान बदलांचा महिलांवर काय प्रभाव आहे हे विशेषत्वाने पाहिले जाते, राज्यातील मराठवाडा ते कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र अशा १० विभागांमधील महिलांच्या अनेक संघर्षकथा पुढे आल्या आहेत. या कथा आता baimanus.in या संकेतस्थळावर तसेच प्रमुख इंग्रजी व मराठी वृत्तवाहिन्या व माध्यमांवर उपलब्ध आहेत.
आरएससीडीः..... रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट (आरएससीडी) ही संस्था १९९४ मध्ये स्थापन करण्यात आली. आर.एम.सी.डी चा उद्देश तळागाळात काम करणाऱ्याचं जाळ तयार करून त्यांचा प्रचार करणे आणि एक असा समाज निर्माण करणे आहे जिये बंचित घटकांना समान आणि योग्य संधी मिळेल व ते सन्मानाने, न्यायाने आणि स्वतंत्रपणे जगतील. आर.एम.सी.डी ने महिला राजसत्ता आंदोलन, सावित्री अकादमी, सामाजिक संस्था मंच, महिला महापंचायत, दलित हक्क अभियान, मराठवाडा दुष्काळमुक्त अभियान तसेच शासनासोबतही अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत. सध्या, आरएससीडीने महाराष्ट्रातील १० जिल्ह्यामध्ये हवामान बदल हा विषय लोकांना, विशेषतः महिला व आदिवासी गटांना कसा परिणाम करतो हे समजून घेण्यासाठी २५० गाव संवाद' उपक्रम आयोजित केले आहेत. हे गाव संबाद खियांनीच त्यांच्या समुदायांमध्ये म्वतःच आयोजित केले. या संवादांनी हवामान बदल परिणामांच्या अनेक क्षेत्रांना अधोरेखित केले आहे. तसेच गाव पातळीवर जल प्रशासनात महिलाचा आवाज बुलंद व्हावा यासाठी काम सुरु केले आहे.
0 टिप्पण्या