भारतीय संविधानाच्या निर्माणाला ७५ वर्ष झाली. आपल्या संविधानाचे निर्माण देशाचा राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी तसेच नागरिकां समवेत देशाला मानवी मूल्यांच्या आधारावर घडविण्याच्या अपेक्षेने झाले . याच संविधान निर्मातांच्या उद्देष्याला अनुसुरून संविधानिक मूल्य जनमानसात रुजवीत सुजाण, सक्रीय जबाबदार नागरिक घडण्याच्या तसेच लोकशाहीच्या संवर्धनाच्या सेंटर फोर प्रमोटिंग डेमोक्रसी सिपिडी संस्था मुंबई, महाराष्ट्रांमध्ये गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत आहे. भारतीय संविधानाच्या पंचाहत्तरीचे निमित्त साधून सिपिडी संस्थेने मुंबईतील १० ते १२ श्रमिक लोकवसाहती मध्ये संविधानिक मुल्यांवर युवकांसोबत संवाद साधण्यासाठी “संविधान जागर सप्ताह” निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन २१ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत केले.
संविधान जागर सप्ताह” उत्सव निमित्ताने खालील प्रमाणे कार्यक्रम करण्यात आले.*- *अमन शांति नगर, शिवडी*
- २१/११/२०१४ - युवकांसोबत संविधान गपशप च्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचे सत्र घेतले.
- २१/११/२०१४ - ‘समानता’ च्या मुल्यावर आधारित चित्रकला स्पर्धा
- २२/११/२०२४ - भेडीये को दृष्ट क्यों कहते है ? ( गोष्ट वाचून युवाकंसोबत समाजामध्ये असलेल्या जाती, धर्म, वर्ण, वर्ग च्या आधारावर भेदभाव करण्याच्या विचारावर योग्य संवाद )
- २२/११/२०२४ - संविधान रैली *मोराचा पाडा, आरे गोरेगाव*
- २१/११/२०१४ - युवकांसोबत संविधान गपशप च्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचे सत्र घेतले.
- २३/११/२०२४ - ‘स्वतंत्र’ या मूल्यावर निबंध स्पर्धा आणि डान्स स्पर्धा घेतली.
- २४/११/२०२४ : ‘समानता’ या मूल्यावर चित्रकला स्पर्धा आणि’ बंधुता’ या मूल्यावर रांगोळी स्पर्धा घेतली.
- *हर घर संविधान, घर घर संविधान रेल्वे अभियान*
- २२/११/२०२४ : दादर ते बोरीवली - गोरेगाव ते पनवेल पर्यंत रेल्वेतील प्रवाश्यान्सोबत संविधानिक मूल्य आपल्या दैनंदिन जीवनात कसे सन्मानाने जगण्यासाठी साथ देतात यावर संवाद साधला आणि संविधानाच्या उद्देशिकाचे वाटप केले.
- *संविधान महोत्सव, पनवेल कार्यक्रमाच्या तयारीत सहभाग*
- २२/११/२०२४ : संविधान महोत्सव, पनवेल इथे कार्यक्रमाच्या तयारी साठी संपूर्ण टीम ने आयोजकांना साथ दिली.
- *भीम नगर, मानखुर्द*
- २३/११/२०२४ - युवकांसोबत संविधान गपशप च्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचे सत्र घेतले.
- २५/११/२०२४ : संविधानिक मुल्यांवर आधारित पथनाट्य सादर केले तसेच संविधान रैली काढली.
- *मंडाला, मानखुर्द*
- २४/११/२०२४ : युवकांसोबत संविधान गपशप च्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचे सत्र घेतले.
- २४/११/२०२४ : संविधानिक मुल्यांवर आधारित चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा घेतली.
- २५/११/२०२४ : संविधान रैली काढली.
- *गौतम नगर गोराई , बोरीवली*
- २४/११/२०२४ : युवकांसोबत संविधान गपशप च्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचे सत्र घेतले.
- २७/११/२०२४: संविधानिक मुल्यांवर आधारित क्विझ कम्पटीशन, चित्रकला स्पर्धा चे आयोजन केले आहे.
- *गणपत पाटील नगर, बोरीवली*
- २४/११/२०२४ : युवकांसोबत संविधान गपशप च्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचे सत्र घेतले.
- *चिकुवाडी, बोरीवली*
- २५/११/२०२४ : रहिवाश्यांसोबत संविधान गपशप च्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचे सत्र घेतले.
- *सिद्धार्थ नगर, अंधेरी*
- २५/११/२०२४ : संविधानिक मुल्यांवर आधारित चित्रकला स्पर्धा घेतली.
- २६/११/२०२४ : युवकांसोबत संविधान गपशप च्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचे सत्र घेतले सोबत संविधान रॅली ही काढली.
या ‘संविधान जागर सप्ताह’ उत्सवाला यशस्वीरीत्या साजरा करण्यासाठी सिपिडी चे नवयुवक साथी वंदना, सलमान, प्रियांका , ख़ुशी, वरून, कोमल, अल्ताफ यांनी जबाबदारीने पुढाकार घेवून ह्याला यशस्वीरीत्या पार पाडले आहे. सोबत सिपिडी चे इतर साथी अबरार, सुनिल, प्रवीण, अक्षता, योगेश, जगदीश , सुनिल जैस्वार, मानसी, दिपक यांनी हि मोलाची साथ दिली असे सिपिडी चे समन्वयक विशाल जाधव यांनी सांगितले.
विशाल जाधव - 8692-837143
0 टिप्पण्या