आंबेडकरी चळवळीला बाबासाहेबांच्या विचारांचे एक अधिष्ठान आहे, पण या आंबेडकरी चळवळीत काही जणांनी दलाल स्ट्रीट उभी केलीय. ही दलाल स्ट्रीट नष्ट केल्याशिवाय आंबेडकरी चळवळीला भवितव्य नाही. हाच विचार घेऊन आम्ही घटनेचा आदर राखणार्या मविआला यंदाच्या निवडणूकीत जाहीर पाठींबा देत आहोत अशी घोषणा रिपब्लिकन एकता आघाडीचे निमंत्रक आणि ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे यांनी आज केली. मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या ‘उत्सव लोकशाही’चा वार्तालापात ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण विश्वस्त राही भिडे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी हे व्यासपीठावर उपस्थित होते.
‘
‘अलिकडे संविधान बदलण्याचा विचार काही मंडळी करताहेत. पण मी त्यांना विचारू इच्छितो की, स्वातंत्र्य लढ्यात संघाचे स्थान काय? ज्यांनी स्वातंत्र्याचा लढा नाकारला. त्यांनी संविधानाचा ढाचा बदलण्याची भाषा करू नये. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राने त्यांना गुडघे टेकवणे भाग पाडले याचे भान त्यांनी ठेवावे. म्हणूनच आम्ही संविधान बचावासाठी लढणार्या महाविकास आघाडीच्या पाठीशी आहोत. खरं तर आरक्षण हाच प्रश्न हा समाजव्यवस्थेने निर्माण केला. सध्या तो प्रश्न ऐरणीवर आहे. संविधान ही समस्त भारतीयांची अस्मिता असून प्रत्येक भारतीयाला संविधानाने स्वातंत्र्य बहाल केले आहे, त्यामुळेच भारतीयांची संकल्पना संघ परिवाराला खुपते आहे. आणि म्हणूनच दलित पिडीतांची प्रगती रोखण्यासाठीच संविधान बदल ही मंडळी करू पाहताहेत. पण त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. असेही ते म्हणाले. भारताचे संविधान बदलण्याच्या विचारातील मंडळी स्वातंत्र्यलढ्यात संघाचे स्थान नव्हते काय? स्वातंत्र्याचा लढा नाकारला! संविधानाचा ढाचा मानणारे मनुवादी प्रवृत्ती शोषितांना नाकारणारे प्रगतीपथाला जातात. यात आंबेडकरवादी प्रतिभावंत खुप होते.
आरक्षण प्रश्न समाज व्यवस्थेने निर्माण केला आहे. संविधान हा समस्त भारताच्या अस्मितेचा प्रश्न आहे. जातिसमुहात रमणार्यांना भारतीयत्वाची संकल्पना खुपते आहे. चळवळ आणि आंबेडकरवाद याचे अधिष्ठान सोडून आंबेडकरांच्या नावाने दलाली सुरू झाली. तिला नेस्तनाबूत केल्याशिवाय पर्याय नाही. भाजप, संघ यांच्या पाठीशी उभे आहेत. आजच्या नवीन पिढीकडे दिशा नाही. दलित पँथर, आघाडी आणि अन्य छोटे समूह हे खटपट करून एकत्र आल्याने संविधानाच्या समर्थनार्थ उभे राहात आहेत, असे असले तरी इथले भय अजून संपलेले नाही. वैचारिक, सांस्कृतिक चेहरा, पुरोगामी चेहरा याचे विद्रूपीकरण सुरू आहे. आमच्याशी निगडीत सामाजिक संस्था या सर्व एकत्र असल्याने संविधान वाचविण्याची आम्हाला खात्री आहे. याकरिता आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. सामाजिक सुधारणेच्या खात्याचा निधी लाडक्या बहिणीला जो पैसा देता तो सामाजिक योजनेंसाठी खर्च करायला हवा. आरक्षणाचा प्रश्न उगाच जातीत तेढ निर्माण करणे, जातीधर्माच्या नावाने आवाहन करणे या सर्व बाबी या जनतेलाही पसंत नाहीत. याबाबत निश्चित असे प्रगत महाराष्ट्राचे धोरण लोकांपुढे येण्याची गरज आहे. राज ठाकरे हे शरद पवारांच्या विरोधात बोलताना त्यांनी पेशवाई पगडी बाजूला करून महात्मा फुलेंची पगडी दिली, असे ते म्हणाले. यातून त्यांचा मानसिक तोल ढळलेला आहे असे दिसून येते. या बाबीकडे सामाजिक आणि वैचारिक दृष्टीकोनातून पाहिले असता फुलेंची पगडी ही समतेचा उद्घोष करते. ‘बटेंगे तो कटेंगे’ या भाजपच्या नार्याबाबत त्यांनी असंतोष व्यक्त केला. पुरोगामी महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक परंपरेला हे विचार धक्का देणारे आहेत, असे त्यांनी मत व्यक्त केले. महाराष्ट्राचे खच्चिकरण सर्वच पातळीवर सुरू आहे. काही झाले तरी महाराष्ट्र हा जनमानसात एकच राहणार आहे. राजकारणातील या चिखलफेकीकडे सामान्य माणूस लक्ष न देता आपला समानतेचा दृष्टीकोण हाच निर्णायक ठरवेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
दलित चळवळीत सवते सुभे खूप निर्माण झालेत. रिपब्लिकन पक्षाचे गट-तट इथे राहिलेले आपण पाहात आहोत. परंतु आंबेडकरवादी जनतेने या गटा-तटांना लोकसभा निवडणुकीत धडा दिला. त्यामुळे अनेकांची दुकाने बंद झाली. नेतृत्व संपुष्टात आणले. याबद्दल दलित नेत्यांनी आता धडा घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. संघ परिवाराच्या पाठीशी उभे रहाणे ही लाचारी आहे. ती सोडून मात्र नव्या पिढीने छोट्या स्वरूपात का होईना स्वतंत्रपणे स्वतंत्र बाण्याने उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टिका करताना अर्जुन डांगळे म्हणाले, ‘राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘अवकाळी पाऊस’ अशा सोप्या शब्दात निर्भत्सना करताना राज ठाकरे हे कोणतीही वैचारिकता नसलेले नेते आहेत.’दुकानावरच्या पाट्या, भोंगे आणि टोल नाक्यापलिकडे राज ठाकरेंची मजल गेलेली नाही. त्यांनी महिला, बेरोजगारी, शेतकरी या प्रश्नावर काहीही विधायक भूमिका घेतलेली नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले.
आता आम्ही मुहब्बतीचे दुकान चालविणारे संविधान रक्षक अर्थात महाविकास आघाडीच्या पाठीशी आहोत. महाराष्ट्राची संस्कृती मराठीबाणा आणि अस्तित्व यावरही त्यांनी भाष्य वेâले.
0 टिप्पण्या