बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्याच्या बजेटमध्ये 98 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2018-19 से 2024-25 या सात वर्षांत आरोग्याचे बजेट रू. ₹3,637 कोटी वरून रू. 7,191 कोटी झाले, गेल्या दशकात मुंबई महानगरपालिका दवाखान्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता तिप्पट झाल्याचे आढळून आले आहे, 2014 मध्ये 12% हून वाढून हे प्रमाण 2023 मध्ये 37% झाले. दर 15000 लोकसंख्येमागे एक दवाखाना पाहिजे असा शहरी आणि प्रादेशिक विकास योजना आखणी आणि अंमलबजावणी (URDPFI) दंडक असून 2023 पर्यंत त्याची पूर्तता मुंबईतील एकाही वॉर्डमध्ये झालेली नाही. एकूण 207 हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिकपैकी 97 क्लिनिक सध्या उपलब्ध महापालिका दवाखान्यांमध्ये त्यांचे कामकाज संपल्यानंतर चालवली जातात, त्यामुळे केवळ 110 क्लिनिक स्वतंत्र जागेमध्ये चालू आहेत.
प्रजा फाऊंडेशनच्या वतीने 'मुंबईतील आरोग्य समस्यांची स्थिती 2024' हा अहवाल आज 7 नोव्हेंबर रोजी मुंबई प्रेस क्लब येथे प्रकाशित करण्यात आला. यावेळी संस्थेचे मिलिंद म्हस्के, एकनाथ पवार, श्रेयस चोरगी, निलम मिराशी आदी संस्थेचे मान्यवर उपस्थित होते. मुंबईतील प्राथमिक आरोग्य सेवा, मुख्य आजारांचा प्रादुर्भाव, श्वसनाचे आजार आणि तैनात आरोग्य कर्मचायांची संख्या यांची सद्यस्थितीबाबत या अहवाल नमूद करण्यात आले आहे. या सेवा मुंबईकरांचे आरोग्य व स्वास्थ्य जपण्याच्या दृष्टीने, पर्यायाने नागरिक म्हणून समाजात सक्रीय योगदान देण्याची क्षमता टिकून राहावी यासाठी, महत्त्वाच्या असल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या दहा वर्षातल्या (2014 to 2023) रूग्णालयातील नोंदणीकृत केसेसनुसार डायरिया/अतिसार (9,36,061), टीबी (3,89,803), उच्च रक्तदाब (3,70,795), मधुमेह (3,70,081) आणि डेंग्यू (1,39,892). 2014-2022 या कालावधीत झालेल्या मृत्यूमागील प्राधान्याची कारणे प्रामुख्याने मधुमेह, श्वसनाचे गंभीर आजार, टीबी आणि उच्च रक्तदाब.हे आजार आढळले असल्याचेही प्रजा फाऊंडेशनने केलेल्या सर्व्हे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे."जीवनशैलीशी निगडित मधुमेहासारख्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 2014 मध्ये 2,428 होती, जी 2022 पर्यंत 14,207 झाली; मृत्यूसंख्येत 485% ने बाड झाली असून आता मृत्यूच्या कारणांमध्ये मधुमेह सर्वात वरचे कारण ठरत आहे", अशी माहिती प्रजा फाऊंडेशनचे सीईओ मिलिंद म्हस्के यांनी सांगितली, बाजाराचे हे प्रमाण आटोक्यात आणणे जरूरीचे आहे आणि त्यामाठी शहरी नियोजन आणि विकासाच्या संदर्भात भारत सरकारच्या 'गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA)' चे 'शहरी आणि प्रादेशिक विकास योजना आखणी आणि अमजवजावणी (Urban and Regional Development Plans Formulation and Implementation - URDPFI) दिशानिर्देश महत्त्वाचे असून त्यांचे पालन होणे गरजेचे आहे. व्यक्तीचे आरोग्य, स्वास्थ्य आणि शारीरिक हालवालीकरिता दरडोई किमान 10 चौरसमीटर खुली जागा उपलब्ध असनी पाहिजे अशी त्यातील एक शिफारस आहे. मात्र मुंबई विकास आराखडा (2014-2034) मध्ये दरडोई केवळ 3 चौमी खुली जागा प्रस्तावित केली आहे. मुंबईत दर व्यक्तीमागे उपलब्ध खुली जागा वाढवण्यासाठी त्वरित पाऊले उचलण्याची गरज वावरून अधोरेखित होते, तसेच नागरिकांचे आरोग्य व स्वास्थ्य जपण्यासाठी उपलव्ध पायाभूत सेवासुविधा पुरेशा नसून त्या विस्तारण्याची गरजही लक्षात येते", असे म्हस्के बांनी म्हटले.
मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. 2019 से 2022 था कालावधीत शहरातील सरासरी हवेच्या गुणवत्तेची पसरण 'समाधानकारक' (51-100 हवा गुणवत्ता निर्देशांक AQI) वरून 'मध्यम' (101-200 हवा गुणवत्ता निर्देशांक AQI) वर झालेली आहे, अशी माहिती प्रजाच्या क्षमता विकास विभागाचे सहयोगी व्यवस्थापक एकनाथ पवार यांनी दिली. "याच कालावधीत (2019 ते 2022) 'श्वसनाचे गंभीर आजारांमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 33,711 आहे, तर आणखी 16,345 जणांचे मृत्यू टीबीमुळे झालेले आहेत. हवा प्रदूषणाचा जबरी फटका नागरिकांना बसत आहे हे या आकड्यांवरून लक्षात येते. 2023 माये ही हवेची गुणवत्ता आणखी पसरल्याचे दिसते, कारण पूर्ण वर्षभरात हवेची गुणवत्ता चांगली' (0-50 AQI) आहे असे एकाही महिन्यात घडले नाही' असे त्यांनी म्हटले,
"मुंबईत, URDPFI दिशानिर्देशांच्या तुलनेत, 525 दवाखाने कमी आहेत. शहरात सध्या महापालिकेचे 191 दवाखाने अस्तित्वात आहेत, परंतु यातील 95% दवाखाने (181) दिवसाचे केवळ 7 तास चालू असतात, जशी माहिती प्रजाच्या संशोधन विभागाचे सहयोगी व्यवस्थापक श्रेयस चोरगी यांनी दिली. "2022 पासून वाढवत महापालिकेने 207 हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक सुरु केली. आरोग्य सेवा विस्तारण्यासाठी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह होते, परंतु 207 पैकी 97 क्लिनिक आधीच्याच महापालिका दवाखान्यांमध्ये चालवली जातात आणि केवळ 6% (207 पैकी 13) दवाखाने चौदा तास सेवा देतात (7:00 AM to 10:00 PM). आरोग्य सेवांची उपलब्धता वाढवण्यासाठी सर्व महापालिका दवाखाने 14 तास चालू असले पाहिजेत, विशेषतः झोपडपट्टीबहुल प्रभागामध्ये जिथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे तिथे, कारण तिथे दवाखान्यांची गरज सर्वाधिक आहे, जसे त्यांनी म्हटले.
गेल्या तीन वर्षापासून महापालिका निवडणुका प्रलंबित असून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत महापालिकेचा कारभार चालू आहे. त्यामुळे सक्रीय आरोग्य समिती गठित झाली नाही याकडे म्हस्के यांनी लक्ष वेधले आणि कृतीचे मुद्दे अधोरेखित केले. मुंबईतील आरोग्याची सद्यस्थिती सुधारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कार्यक्षम करण्याला प्राधान्य द्यायला हवे आणि यासाठी नागरिकांनी पुढाकार व सहभाग घ्यायला हवा, आरोग्यासंबंधी, तसेच मृत्यू व आजारासंबंधी, डेटा तत्काळ (रियल-टाईम) संकलित होण्यासठी 'राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा (National Health Management Information Systern NHMIS) पूर्णतः कार्यान्वित करणे गरजेचे आहे. महापालिकेने मुंबईकरांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि जागतिक दर्जांचे शहर म्हणून मुंबईचे स्थान उंचावण्यासाठी जुन्या जागांचा विस्तारण्याला आणि आरोग्य सेवा सक्षम करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. नागरिकांचे आरोग्य जीवन सुधारण्यासाठी केलेल्या अशा बदलांमुळे जीवनशैलीशी निगडित आजाराचे प्रमाण आटोक्यात यायलाही मदत होईल', असे म्हस्के म्हणाले,
प्रजा फाउंडेशन विषयी- प्रजा फाऊंडेशन गेल्या वीस वर्षापासून सक्रीय असून आपल्या लोकप्रतिनिधींचे कामकाज कारभार उत्तरदायी व्हावा हा संस्थेच्या कामाचा मुख्य हेतू आहे. नागरिकांच्या समस्यांवर डेटा आधारित संशोधन करणे आणि या समस्या सोडवण्याची जबाबदारी असलेले घटक म्हणजे लोकप्रतिनिधी, नागरिक, माध्यमे आणि प्रशासन यांच्यापर्यंत संशोधनाचे निष्कर्ष नेणे हा संस्थेच्या कामाचा मुख्य भाग आहे. तसंच लोकप्रतिनिधीसोबत काम करणे हाही संस्थेच्या कामाचा भाग आहे, ज्यामध्ये आम्ही त्यांता क्षमता विकासापासून ज्ञान वृद्धींगत करण्यापर्यंत सहाय्य करतो आणि समस्या निर्मूलन व सुधारणेसाठी प्रवृत्त करतो, जनसामान्यांचे आयुष्य सुकर करणे, तथ्ये समोर आणून सक्षमीकरण करणे, परिवर्तनाची साधने निर्माण करून नागरिकांचे जीवनमान उंचावणे असे दूरगामी बदल साधणे हे प्रजाचे ध्येय आहे. लोकसहभागातून उत्तरदायी आणि कार्यक्षम समाज निर्मिती करणे ही आपली बांधिलकी आहे ही प्रजाची धारणा आहे.
0 टिप्पण्या